शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अभिनंदन यांच्या ५१ व्या स्क्वाड्रनला मिळणार पुरस्कार, बालाकोट हल्ल्यातील कामगिरीचाही होणार गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 05:05 IST

पाकिस्तानच्या विमानांनी भारतावर हल्ला करायचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाच्या विमानांनी २७ फेब्रुवारी रोजी हाणून पाडला होता.

नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानचा प्रतिहल्ला विफल करणाऱ्या व त्या देशाचे एफ-१६ विमान पाडणा-या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या ५१ व्या स्क्वाड्रनला भारतीय हवाई दलदिनी ८ आॅक्टोबरला हवाई दलप्रमुख आर. के. एस. भदौरिया यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.पाकिस्तानच्या विमानांनी भारतावर हल्ला करायचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाच्या विमानांनी २७ फेब्रुवारी रोजी हाणून पाडला होता. या महापराक्रमाबद्दल हवाई दलाच्या ५१ व्या स्क्वाड्रनचे कमांडिंग आॅफिसर ग्रुप कॅप्टन सतीश पवार हे हा पुरस्कार स्वीकारतील.बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे दहशतवादी तळ भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बॉम्बफेक करून उद्ध्वस्त केले. त्यानंतर दुसºयाच दिवशी पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांनी भारतावर हल्ला चढविण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडण्यात आला.एफ-१६ सारखे अत्याधुनिक विमान भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ विमानाने पाडले. ही कामगिरी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी केली होती. त्यांचे विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाडण्यात आले. अभिनंदन यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी अटक केली. मात्र भारताने दाखविलेल्या कणखर भूमिकेमुळे त्यांची १ मार्च रोजी पाकिस्तानने सुटका केली. त्यानंतर त्यांनी सहा महिने विश्रांती घेतली. प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यानंतर ते २ सप्टेंबर रोजी पुन्हा सेवेत रुजू झाले.तत्कालीन हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांच्यासोबत त्यांनी मिग-२१ विमानातून उड्डाणही केले. पाकिस्तानशी मुकाबला केल्याबद्दल अभिनंदन यांना स्वातंत्र्य दिनी वीरचक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेहोते.६०१ सिग्नल युनिटचाही होणार सन्मानबालाकोट हल्ल्यामध्ये तसेच पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाºया स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांच्या ६०१ सिग्नल युनिटलाही भारतीय हवाई दलदिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पाकिस्तानी विमाने भारतावर चाल करून येत आहेत हे शोधून काढण्यात मिंटी अग्रवाल यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. बालाकोटवरील हल्ल्यामध्ये नऊ क्रमांकाच्या स्क्वाड्रनचे मिराज २००० विमान सहभागी झाले होते. या स्क्वाड्रनलाही पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान