शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन यांचा होणार वीर चक्र पुरस्कारानं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 11:08 IST

केंद्र सरकार भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्रानं सन्मानित करू शकते.

नवी दिल्लीः केंद्र सरकार भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्रानं सन्मानित करू शकते. बऱ्याच दिवसापासून त्यांना वीर चक्र पुरस्कार बहाल करण्यात येणार असल्याची अटकळ बांधली जात होती. एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली होती.आता केंद्र सरकारनं बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन यांचा वीर चक्रानं सन्मान करणार असल्याची चर्चा आहे. तसेच ज्या वैमानिकांनी दहशतवादी संघटनांना नेस्तनाबूत केलं आहे. त्या पाच सर्वश्रेष्ठ वैमानिकांचा हवाई दलाच्या सन्मान चिन्हानं सत्कार करण्यात येणार आहे. मिग-21 बायसन विमानानं एफ-16ला खाली पाडल्यानं हा जगभरात भारताच्या नावावर इतिहास आहे. पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. नंतर त्यांना पकडण्यात आले. भारतील लष्कर, अतिसुरक्षित रेडिओ फ्रिक्वेन्सी (विद्युतचुंबकीय लहरी कंपन) आणि संवेदनशील लॉजिस्टिक (कुमक आणि रसदची व्यूहरचना) ही महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला.भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ 16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं एफ 16 हे विमान पाडलं होतं. पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग 21 हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या हवाली केले होते. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान