अभिजित कोळपे बातमी : भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त हरिनाम सप्ताह
By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST
बेल्हा : पेमदरा येथील श्री भैरवनाथ यात्रा उत्सव व कलशारोहण तसेच पाचव्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
अभिजित कोळपे बातमी : भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त हरिनाम सप्ताह
बेल्हा : पेमदरा येथील श्री भैरवनाथ यात्रा उत्सव व कलशारोहण तसेच पाचव्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ व रात्री हरिकीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत.या काळात शनिवार (दि. २८) सकाळी रामजन्माचे, चिंतामण महाराज दांगट यांचे कीर्तन होणार असून, सायंकाळी चिंतामण महाराज दांगट यांचे कीर्तन होणार आहे. रविवार (दि. २९) आठरे महाराज, सोमवार (दि. ३०) गुंडा महाराज, अहमदनगर., मंगळवार (दि. ३१) भगवान महाराज गडदे, बुधवार (दि. १) दीपक महाराज देशमुख, गुरुवार (दि. २) पांचाळ महाराज, शुक्रवार (दि. ३) अजित महाराज दिघे, शुक्रवार (दि. ३) रोजी सायंकाळी पालखी सोहळा, शनिवार (दि.४) रोजी सकाळी बजरंग महाराज आंधळे यांचे काल्याचे कीर्तन होणार असल्याचे सुनील बेलकर यांनी सांगितले.