शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अबब...! एका औषधाची किंमत १८ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 06:40 IST

दुर्मीळ आजारावर प्रभावी, ब्रिटनची औषधाला मान्यता

जनुकीय दोषांमुळे उद् भवणाऱ्या स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी (एसपीए) या दुर्मीळ आजारावर प्रभावी ठरू शकणाऱ्या औषधाला ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ या ब्रिटनच्या राष्ट्रीय नियामक संस्थेने मंजुरी दिली आहे. मात्र, हे औषध मिळविण्यासाठी ग्राहकाला तब्बल १८ कोटी रुपये (१७ लाख युरो) एवढी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. हे औषध रुग्णाला दिले की त्याच्या शरीरातील जनुकीय दोष दूर होऊन तो ठणठणीत बरा होतो, याची हमी आहे. जाणून घेऊ या औषधाबद्दल... 

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी म्हणजे काय?जनुकीय दोषांतून निर्माण होणारा हा आजार आहे.हा आजार असलेल्या व्यक्तीला मेंदूतील पेशींचा असमतोल आणि पाठीच्या कण्यातील मज्जातंतू पेशींची अनुपस्थिती यांमुळे शरीराच्या हालचाली नियंत्रित करता येत नाही. 

हा आजार कोणाला होतो... जनुकीय दोष असलेल्या लहान मुलांमध्ये हा आजार दिसून येतो.  स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी झालेल्या रुग्णाचे आयुष्यमान फार तर दोन वर्षे असते. 

नवीन औषध काय आहे...नवीन औषधाचे नाव झोल्गेन्समा असे आहे. नोव्हार्टिस जीन थेरपीज यांनी या औषधाची निर्मिती केली आहे.

झोल्गेन्समा काय परिणाम करते?  झोल्गेन्समा घेतल्याने कृत्रिम श्वसनाची गरज भासत नाही. ती स्वत:हून बसू, रांगू आणि चालूही शकतात. केवळ एका डोसमध्ये एवढे सारे बदल रुग्णांमध्ये होतात आणि त्यांची आयुष्यमर्यादा वाढते. 

डोस कसा दिला जातो? त्वचेत इंजेक्शन टोचून औषध शरीरात सोडले जाते. औषधातील घटक जनुकीय दोष काढून स्नायू व शरीराच्या नियंत्रणासाठी प्रथिने निर्मिती करतात. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयLondonलंडन