शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जय श्रीराम म्हणण्यास विरोध केल्यानं आसाममध्ये तीन मुस्लिम तरुणांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 09:59 IST

जय श्रीराम न म्हटल्यानं मुस्लिम तरुणांना मारहाण करण्याचं पुन्हा एक प्रकरण समोर आलं आहे

गुवाहाटी- जय श्रीराम न म्हटल्यानं मुस्लिम तरुणांना मारहाण करण्याचं पुन्हा एक प्रकरण समोर आलं आहे. आसामच्या बारपेटा जिल्ह्यात चार समाजकंटकांनी तीन मुस्लिम तरुणांना अमानुष मारहाण केली आहे. त्यांना जय श्रीराम म्हणण्यास बाध्य करण्यात आलं. दोन आठवड्यांपूर्वीच काही मुस्लिम तरुणांना जय श्रीराम म्हणण्यास दबाव टाकल्यानं काही तरुणांना अटक करण्यात आली होती.पोलिसांच्या माहितीनुसार, फखरुद्दीन अली अहमद मेडिकल कॉलेजच्या जवळ एक गाव आहे. शुक्रवारी इथे चार बाइकस्वार पोहोचले आणि त्यांनी एक कर्मचारी रकीबुल हक याला मारहाण केली. वेस्ट बारपेटा ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष जाकिर हुसैन म्हणाले, समाजकंटकांनी कुर्बान खान आणि बुरान अली यांना पकडलं. ही दोन्ही मुलं एका चहाच्या टपरीवर काम करतात. ते समाजकंटक कोणतंही कारण नसताना कुर्बान खान आणि बुरान अली यांना शिवीगाळ करू लागले आणि त्यानंतर त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्या समाजकंटकांनी तिन्ही तरुणांना जय श्री राम म्हणण्यास बाध्य केलं.पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील दोषींना लवकरच अटक करणार असून, योग्य शिक्षा दिली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी त्या समाजकंटकांच्या मोटारसायकलीही जप्त केल्या आहेत. तत्पूर्वी असदुद्दीन ओवैसींनी या प्रकरणावरून संघावर टीका केली होती.ओवैसींनी संघालाही लक्ष्य केलं होतं. इथे कथित स्वरूपात 'जय श्री राम' आणि 'वंदे मातरम' न म्हटल्यास मुस्लिमांना मारहाण केली जाते. लोकांना मारहाण केली जाते, कारण ते जय श्री राम आणि वंदे मातरमच्या घोषणा देत नाहीत. अशा घटना आता थांबणार नाहीत. फक्त मुसलमान आणि दलितांना टार्गेट केलं जातंय. अशा घटनांच्या मागे एक गट आहे आणि तो संघ परिवाराशी निगडित आहे, असं ओवैसी म्हणाले होते.