शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरुषी हत्याकांड: जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 16:30 IST

तलवार दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आरुषी तलवार हिची 2008 रोजी हत्या करण्यात आली होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये तलवार हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली होती. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.

उत्तर प्रदेश - तलवार दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आरुषी तलवार हिची 2008 रोजी हत्या करण्यात आली होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये तलवार हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली होती. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. तलवार यांच्या घरी काम करणारा नोकर हेमराज गायब असल्याने सर्वप्रथम त्याच्यावर हत्येचा संशय होता. पण दुस-या दिवशी 17 मे रोजी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडला. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2013 रोजी आरुषीचे आई-वडील राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र अलाहाबाद न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांची निर्दोष मुक्तता केलीय. तरीही संपूर्ण प्रकरणाबद्दल रहस्य कायम आहे.- आरुषी व हेमराज हत्या प्रकरणाचा असा आहे घटनाक्रम 16 मे 2008- 14 वर्षांची आरुषी तलवार नोएडातील जलवायू विहार एल-32 या स्वतःच्या घरातील बेडरूमममध्ये मृतावस्थेत सापडली. तिचा गळा चिरण्यात आला होता. त्यावेळी नोकर हेमराजवर संशय घेण्यात आला.17 मे 2008- नोकर हेमराज याचाही मृतदेह नोएडातील जलवायू विहार एल-32 गच्चीवर सापडला.23 मे 2008 - आरुषीचे वडील डॉ. राजेश तलवार यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी आरुषी व हेमराज हत्या प्रकरणात अटक केली.1 जून 2008-आरुषी व हेमराज हत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं.13 जून 2008- डॉ. राजेश तलवारचे कम्पाऊंडर कृष्णाला सीबीआयनं अटक केली. त्यानंतर तलवार यांचे मित्र दुर्रानी यांच्या घरातील नोकर राजकुमार व तलवार यांच्या शेजारील नोकर विजय मंडल यांनाही अटक करण्यात आली. तिघांनाही हत्याकांडातील आरोपी बनवण्यात आलं. 11 जुलै 2008- राजेश तलवार यांना गाझियाबादच्या डासना जेलमधून जामिनावर सोडण्यात आलं.12 सप्टेंबर 2008- कृष्णा, राजकुमार व विजय मंडळ यांना कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला. सीबीआयनं 90 दिवस चार्जशीट फाइल केली नाही. त्यानंतर 2009मध्ये सीबीआयनं दुसरी टीम बनवून त्यांच्याकडे प्रकरण सुपूर्द केलं.10 सप्टेंबर 2010- आरुषी हत्याकांड प्रकरणातील चौकशीसाठी सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट बनवली29 डिसेंबर 2010- सीबीआयनं आरुषी हत्याकांड प्रकरणात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला.28 फेब्रुवारी 2011- सीबीआय कोर्टानं राजेश व नुपूरविरोधात अटक वॉरंट जारी केलं. राजेश तलवार यांनी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात निषेध याचिका दाखल केली.मार्च 2012- कनिष्ठ न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावत आरुषीचे आई-वडील राजेश व नूपुर तलवार यांना हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी दोषी ठरवलं.17 सप्टेंबर 2012- गाझियाबादच्या डासना जेलमध्ये शिक्षा भोगत असलेली आरुषीची आई नुपूर हिला न्यायालयानं जामीन दिला.25 मे 2012- गाझियाबाद न्यायालयानं आरुषी व हेमराज हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा राजेश व नुपूरवर ठपका ठेवला.30 एप्रिल 2012- नुपूर यांनी स्वतः आत्मसमर्पण केलं, त्यानंतर नुपूर यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं.एप्रिल 2013- आरुषी व हेमराज यांचा खून केल्याचं सीबीआयनं न्यायालयात सांगितलं. तसेच आरुषी व हेमराज यांचे मृतदेह विचित्र अवस्थेत सापडले.3 मे 2013- बचाव पक्षानं वकिलांच्या मागणीनुसार विशेष न्यायालयात सीबीआयचे माजी संचालक अरुण कुमार यांच्यासह 14 जणांना समन्स बजावला, मात्र सीबीआयनं याला विरोध केला. 13 मे 2013 - त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं तलवार दाम्पत्याची याचिका फेटाळून लावली.10 ऑक्टोबर 2013- गाझियाबादमधील सीबीआय कोर्टात सुनावणी सुरू झाली.26 नोव्हेंबर 2013- आरुषीचे आई-वडील राजेश आणि नुपूर तलावर यांना सीबीआयनं कोर्टानं दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली21 जानेवारी 2014 - राजेश व नुपूर यांनी सीबीआय कोर्टानं सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली.19 मे 2014- अलाहाबाद कोर्टानं राजेश व नुपूर तलवार यांचा जामीन फेटाळून लावत सुनावणी सुरूच ठेवली.7 सप्टेंबर 2017- अलाहाबाद न्यायालयानं आरुषी हत्या प्रकरणातील निर्णय राखून ठेवला.12 ऑक्टोबर 2017- अलाहाबाद न्यायालयानं पुराव्याअभावी राजेश व नुपूर दाम्पत्याची निर्दोष मुक्तता केली.

टॅग्स :Aarushi murderआरुषी हत्याMurderखून