शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

'आप'च्या मान्यतेलाच धोका, आरोप सत्य सिद्ध झाल्यास...; केजरीवालांवर अ‍ॅक्शन घेत ED नं असं काय केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 13:30 IST

ईडीने या कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगमध्ये केजरीवाल यांच्या विरोधातील प्रकरणात आम आदमी पार्टीची तुलना एका 'कंपनी'सोबत केली आहे. तर पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना डायरेक्टर/CEO असल्याचे म्हटले आहे.

शंभर कोटी रुपयांच्या कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. यानंतर, शुक्रवारी पीएमएलए न्यायालयाने 28 मार्चपर्यंत त्यांची ईडी कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्यानंतर केवळ अरविंद केजरीवालच नाही, तर आम आदमी पार्टीवरही संकट आले आहे. 

ईडीने या कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगमध्ये केजरीवाल यांच्या विरोधातील प्रकरणात आम आदमी पार्टीची तुलना एका 'कंपनी'सोबत केली आहे. तर पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना डायरेक्टर/CEO असल्याचे म्हटले आहे.

पीएमएलएच्या कलम 70 अंतर्गत प्रकरण नोंदवले - अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी केजरीवाल यांच्या कोठडीची मागणी करत, विशेष न्यायालयात म्हटले आहे की, ' अशा पद्धतीने आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांनी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा केला आहे. यासाठी प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए)च्या कलम 70 अंतर्गत प्रकरण नोंदवले आहे.' पीएमएलएचे हे कलम कंपन्यांशी संबंधित प्रकरणात लावले जाते. 'कंपनी'चा अर्थ कुठल्याही कॉर्पोरेट फर्म अथवा कुठल्याही व्यक्तिंच्या समूहिक संघटनेशी आहे.'

ईडीने म्हटले आहे की, 'अरविंद केजरीवाल हे आम आदमी पार्टीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतात. ते संस्थापक सदस्य आहेत आणि धोरण तयार करण्यातही सहभागी असतात. लाच मागण्यातही त्याचा सहभाग आहे. पीएमएलए अंतर्गत गुण्याच्या वेळी 'कंपनी', जिचे नाव 'आप' आहे. कामकाजासाठी जबाबदार होती.' महत्वाचे म्हणजे, मद्य घोटाळ्यातून मिळालेल्या  पैशांचा वापर पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी केल्याचेही ईडीचे म्हटले आहे. तसेच, 45 कोटी रुपये हवालाच्या माध्यमाने गोव्यात प्रचारासाठी पाठवण्यात आले होते, असा दावाही संस्थेने केले आहे.

...तर निवडणूक आयोगाकडून पक्षाची मान्यताही रद्द केली जाऊ शकते -ईडीने म्हटले आहे की, अशाप्रकारे केजरीवाल आणि आम आदमी पार्टी या दोघांविरुद्धही पीएमएलच्या कलम 70 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएमेएलए प्रकरणात एखाद्या राजकीय पक्षाचा सहभाग असल्याची ही पहिलीच वेळ आहे. जाणकारांच्या मते, ईडीच्या ताज्या स्टँडमुळे आम आदमी पक्षासमोर मोठे संकट निर्माण होऊ शकते. पक्षाचे कार्यालयही जप्त केले जाऊ शकते. एवढेच नाही, तर ईडीने लावलेले आरोप सत्य सिद्ध झाल्यास, निवडणूक आयोगाकडून पक्षाची मान्यताही रद्द केली जाऊ शकते. मात्र अद्याप, ईडीने 'आप'विरोधात केस दाखल केलेली नाही.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAam Admi partyआम आदमी पार्टी