शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’चे पक्ष कार्यालय सील, सर्व नेत्यांना बाहेरच रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 08:23 IST

कारवाईचा कार्यकर्त्यांकडून निषेध, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे (आप) दिल्लीतील कार्यालय सर्व बाजूंनी सील करण्यात आले असून, याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाईल, असे आपच्या वरिष्ठ नेत्या आतिशी यांनी शनिवारी सांगितले. आतिशी यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले की, लोकसभा निवडणुकीच्या काळात एका राष्ट्रीय पक्षाचे कार्यालय सील करणे, हे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या ‘समान संधी’च्या विरुद्ध आहे. यावर तक्रार करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळ मागत आहोत. 

आतिशी यांना पोलिसांनी कार्यालयात जाण्यापासून रोखले असा आरोप आपच्या वतीने करण्यात आला. आतिशी यांनी एक व्हिडीओ एक्सवर टाकला. त्यात आतिशी आणि पोलिस अधिकाऱ्यांत हुज्जत सुरू असल्याचे दिसते. शहीद दिनाचे औचित्य साधून आपने शहीद पार्कवर जोरदार निदर्शने केली. खबरदारीचा उपाय म्हणून मध्य दिल्लीत सुरक्षा दलांनी कडक बंदोबस्त लावला. 

आपचे अन्य एक वरिष्ठ नेते तथा दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही केंद्र सरकारने आपच्या कार्यालयाची सर्व प्रवेशद्वारे बंद केल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाने निष्पक्ष भूमिका घेऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी, असे ते म्हणाले. आपचे दिल्लीतील कार्यालय डीडीयू मार्गावर आहे. याच मार्गावर भाजपचे मुख्यालय आहे. शुक्रवारी आपच्या कार्यकर्त्यांनी भाजप मुख्यालयावर निदर्शने केली होती. तेव्हा पोलिसांनी आपचे कार्यालय बंद केले होते.

अरविंद केजरीवाल यांची चौकशी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली होईल. चौकशीचे फुटेज सुरक्षित ठेवले जाईल. ते दररोज अर्धा तास आपली पत्नी सुनीता आणि खासगी सचिव यांना भेटू शकतील, त्यांना डॉक्टरांच्या सूचनेनुसार जेवण दिले जाईल, असे आदेशात म्हटले.

जर्मन दूतावासाच्या उपप्रमुखास समज केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी जर्मनीच्या विदेश मंत्रालयाने अनावश्यक टिप्पणी केल्यामुळे शनिवारी भारतीय विदेश मंत्रालयाने दिल्लीतील जर्मन दूतावासाचे उपप्रमुख जॉर्ज एनजव्हिलर यांना पाचारण करून समज दिली. भारताच्या न्यायालयीन प्रक्रियेतील हस्तक्षेप तसेच पूर्वग्रहदूषित वक्तव्ये अनपेक्षित असल्याची समज त्यांना देण्यात आली. केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना जर्मन विदेश मंत्रालयाने म्हटले होते की, न्यायालयाचे स्वातंत्र्य आणि मूलभूत लोकशाही सिद्धांत या प्रकरणातही लागू होतील, अशी आम्हाला आशा आहे.

ईडी पैशांचे व्यवहार सिद्ध करू शकली नाही आप नेत्या आतिशी यांनी सांगितले की, दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणाची ईडीने २ वर्षे चौकशी केली. कित्येक छापे मारले. अनेक नेत्यांना अटक केली. मात्र, आतापर्यंत एका पैशाच्या देवघेवीचा पुरावाही ईडी मिळवू शकलेली नाही.

केजरीवाल देशात क्रांती आणतील : मानआप नेते तथा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी यांच्यासह अन्य नेत्यांनी शनिवारी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त शहीद पार्कला भेट दिली. तेथे मान यांनी सांगितले की, भाजप देशात हुकूमशाही आणू पाहत आहे. पण, केजरीवाल बाहेर येतील आणि मोठी क्रांती आणतील.

पोलिस अधिकाऱ्यास तेथून हटवा आपल्याला न्यायालयात आणले जात असताना अकारण कठोर व्यवहार करणारे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) ए. के. सिंह यांना हटविण्याची विनंती अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयास एका याचिकेद्वारे केली. त्यावर विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले.

 

टॅग्स :AAPआप