नवी दिल्ली: आम आदमी पार्टीतील (आप) वाढत्या कुरबुरींमुळे अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडत असतानाच राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव या नेतेद्वयांच्या समर्थनात बोलणारे पतियाळामधील आपचे खासदार धर्मवीर गांधी हे सुद्धा नाराज आहेत. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवून आपल्याविरुद्ध सुरू असलेल्या निंदा मोहिमेची तक्रार त्यांनी केली आहे.गांधी राष्ट्रीय कार्यकारिणीतून हटविल्यानंतर यादव व भूषण यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत सहभागी झाले होते. लोकशाही सिद्धांत पायदळी तुडविण्यात येत असल्याबद्दल त्यांनी नेतृत्वावर शरसंधानही साधले होते.
‘आप’चे खासदारही राजीनाम्याच्या बेतात
By admin | Updated: April 3, 2015 23:45 IST