शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘आप’ने गमावली एक कोटीची अनामत

By admin | Updated: May 26, 2014 03:14 IST

केवळ १० हजार रुपये भरून जामीन घेण्यास नकार देणार्‍या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला त्यापेक्षा हजारपट रकमेला लोकसभा निवडणुकीच्या निकालाने मुकावे लागणार आहे.

नवी दिल्ली : केवळ १० हजार रुपये भरून जामीन घेण्यास नकार देणार्‍या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला त्यापेक्षा हजारपट रकमेला लोकसभा निवडणुकीच्या निकालाने मुकावे लागणार आहे. ‘आप’ने देशभरात लोकसभेच्या ५४३ पैकी ४३२ जागा लढविल्या आणि ४१४ जागांवर त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. या जप्त झालेल्या अनामत रकमेपोटी ‘आप’ला आता एक कोटी रुपये गमवावे लागणार आहेत. ‘आप’च्या फक्त १८ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचविता आली. त्यात पंजाबमधील ८, दिल्लीतील ७ आणि चंदिगढ, महाराष्टÑ (चंद्रपूर) आणि उत्तर प्रदेश (वाराणशी)मधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. ४१४ जागांवर ‘आप’ उमेदवारांना एकूण मतांच्या एक षष्ठांश मते मिळविण्यात अपयश आले. मतदारसंघात झालेल्या मतदानापैकी किमान एक षष्ठांश मते मिळविणार्‍या उमेदवारांचीच अनामत रक्कम जप्त होत नाही. ज्यांना इतकी मते मिळत नाहीत, त्यांची अनामत रक्कम जप्त होऊन सरकारी कोषागारात जाते. लोकसभा निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराला लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ३४ (१) (अ) अन्वये २५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. अनुसूचित जाती, जमाती व भटक्या जमातींच्या उमेदवारांसाठी ही अनामत रक्कम १२,५०० रुपये ठेवण्यात आली आहे. एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश मते मिळविण्यात अपयश आल्यास ही ‘आप’च्या राखीव मतदारसंघातील उमेदवारांची संख्या उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांनी २५ हजार रुपये भरल्याचे गृहीत धरून हा १ कोटी ३ लाख ५० हजारांचा आकडा काढण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)