शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

'आप' देशभरात १०० जागा लढवणार, २५ जागी विजयाचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 05:47 IST

भल्याभल्या राजकीय पंडितांना चक्रावून दिल्लीत विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने २०१९ साली होणाºया लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

नवी दिल्ली  - भल्याभल्या राजकीय पंडितांना चक्रावून दिल्लीत विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने २०१९ साली होणाºया लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. देशभरात १०० जागा लढवून २५ ठिकाणी विजयी होण्याची रणिनती पक्षाने आखली आहे. देशभरात बिगरभाजपा सकार स्थापनेसाठी मदत करण्याची आपची भूमिका असल्याचा दावा पक्षसूत्रांनी केला.गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोणतेही राजकीयदृष्ट्या वादग्रस्त विधान केले नाही. त्यांनी कोणत्याही पक्षावर टीका केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र त्यांनी थेट आव्हाना दिले. नायब राज्यपालांमार्फत राज्यकारभारात ढवळाढवळ करण्यापासून ते 'राफेल' प्रकरणात कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली, या कडे पक्ष सूत्रांवी लक्ष वेधले. आम आदमी पक्षामुळे लोकांना बिगर भाजप, बिगर काँग्रेसचा पहिल्यांदाच पर्याय मिळाला. त्यावरच मते मागणार असल्याचे सूतोवाच सूत्रांनी केले.केजरीवाल यांना पक्षाला दिल्लीतून आता बाहेर न्यायचे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत १०० जागा लढवून किमान २५ ठिकाणी विजयाची रणनिती आतापासूनच आखण्यात येत आहे. दिल्ली, हरियाण व पंजाबमध्ये जास्तीत जास्त जागांवर विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा सूत्रांनी केला. दिल्लीत व्यापाºयांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत भरघोस मते दिली. व्यापारी सध्या सीलिंगने त्रस्त आहेत. सातही ठिकाणी आपचे खासदार झाले असते तर सीलिंगचा प्रश्न सोडवला असता, असे वक्तव्य केजरीवालांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे दिल्लीत व्यापाºयांनादेखील आप भरघोस आश्वासने देणार आहे.या राज्यांमध्ये लढवणार निवडणूकदिल्ली, हरियाणा, पंजाब व्यतिरिक्त यंदा वर्षाखेर विधानसभा निवडणूक होणाºया मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढवरदेखील पक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे. बिहार, उत्तर प्रदेश व गुजरातमध्येही काही जागा लढवण्यात येतील. पंजाबमधूनच पक्षाचे चार खासदार निवडणून आले होते.हरियाणचे प्रदेश अध्यक्ष नवीन जयहिंद यांच्यावर केजरीवालांना मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यामुळेच केजरीवाल यांनी हरियाणात अलीकडेच सभा घेतल्या होत्या. संघटनात्मक बांधणीसाठी ते नियमितपणे हरियाणाचा प्रवास करतात.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल