शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

AAP in Punjab: पाचपैकी तीन राज्यांत 'पहले आप'; एका राज्यात असेल बहुमताजवळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 06:13 IST

जनमत चाचण्यांचा निष्कर्ष : गोवा, उत्तराखंडमध्ये असेल लक्षणीय स्थानी; तर राष्ट्रीय स्तरावर होईल विस्तार

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष बहुमतापासून किंचित दूर असेल, तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये लक्षणीय स्थानी असेल, असे निष्कर्ष जनमत चाचण्यांतून समोर आले आहेत. या जनमत चाचण्या बरोबर असतील, तर ‘आप’च्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षाच्या दिशेने मोठे पाऊल ठरेल. 

यापूर्वी आपचे राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविण्याचे प्रयत्न फलदायी ठरले नाहीत. ११७ सदस्यांच्या पंजाब विधानसभेत आपला ५३ ते ५७, काँग्रेसला ४१ ते ४५, अकाली युतीला १४ ते १७ जागा मिळतील, असे या चाचण्यांचे म्हणणे आहे. भाजप आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या युतीला तर ठसा उमटविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागेल.आकडे काय सांगतात?n    उत्तराखंडमध्ये ७० जागांच्या विधानसभेत भाजपला ४२ ते ४८, काँग्रेसला १२ ते १६ आणि आपला ४ ते ७ जागा मिळू शकतील.n    ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत भाजपला जेमतेम निम्म्या जागा मिळतील, तर आप हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर येईल, असे या चाचण्या म्हणतात.

पाच राज्यांतील निवडणुकीची घोषणा १५ जानेवारीनंतरशीलेश शर्मा n    उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यातील निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोग १५ जानेवारीनंतर कधीही करू शकतो. आयोगाने आपली तयारी पूर्ण केली आहे; मात्र गृह मंत्रालयाकडून हिरवा कंदिल मिळालेला नाही. n    गृह मंत्रालयाकडून होकार मिळताच निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. त्यानंतर आचारसंहिता लागू होईल. फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आयोगाचा प्रयत्नआहे. n    राजकीय पक्षांनी प्रचार मोहिमेचा वेग वाढविला आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशात ‘लडकी हॅूं, लड सकती हॅूं’ ही घोषणा केली आहे. तर उत्तराखंडात ‘तीन तिगाडा, काम बिगाडा’ घोषणा देत एक व्हिडिओ गाणेही जारी केले आहे. n    भाजपने तीन मुख्यमंत्री बदलले तरीही राज्याचे हाल आहेत, हे सांगण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. n    पंजाबसाठीही पक्ष गाणे तयार करत आहे. सपा, भाजपाने उत्तर प्रदेशात असे व्हिडिओ यापूर्वीच जारी केले आहेत. 

...तर राजकारण सोडीन -सिद्धूचंदीगड : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली तर ५ लाख रोजगार देईन. ते नाही देऊ शकलो तर राजकारण सोडीन, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी रविवारी म्हटले.  फगवारा येथे आयोजित सभेत भाजपवर टीका करताना सिद्धू म्हणाले, “विरोधी राजकीय नेत्यांना एक तर भाजपमध्ये दाखल व्हा नाही तर केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला तोंड द्या, अशा धमक्या दिल्या जात आहेत.”

टॅग्स :AAPआपPunjabपंजाब