शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 19:22 IST

Lok Sabha Elections 2024 : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, सत्येंद्र जैन, राघव चढ्ढा, सौरभ भारद्वाज, संदीप पाठक, पंकज गुप्ता, संजय सिंह आणि आतिशी यांनाही स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे.

 नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने (AAP) पंजाब लोकसभा निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव पहिले आहे. याचबरोबर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचेही नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, सत्येंद्र जैन, राघव चढ्ढा, सौरभ भारद्वाज, संदीप पाठक, पंकज गुप्ता, संजय सिंह आणि आतिशी यांनाही स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियाचे नावही या यादीत सामील आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या परनीत कौर आणि आम आदमी पार्टीचे कुलदीप सिंग धालीवाल यांच्यासह अनेक उमेदवारांनी सोमवारी अर्ज दाखल केले. परनीत कौर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आम आदमी पार्टीचे बलबीर सिंग यांनी पटियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर आम आदमी पार्टीचे कुलदीप सिंग धालीवाल यांनी अमृतसरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. 

भाजपाचे उमेदवार अरविंद खन्ना यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघातून, तर शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) उमेदवार विरसा सिंग वलटोहा यांनी तरनतारन जिल्ह्यातील खादूर साहिब मतदारसंघातून अर्ज दाखल केला. दरम्यान, १४ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, १५ मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १७ मे आहे. तर पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.

परनीत कौर चार वेळा खासदारउमेदवारी दाखल करताना चार वेळा खासदार राहिलेल्या परनीत कौर यांच्यासोबत त्यांचा मुलगा रणिंदर सिंग, मुलगी जय इंदर कौर आणि भाजपा नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी पतियाळा येथील ऐतिहासिक बुर्ज बाबा आला सिंह येथे नमन केले. मार्चमध्ये भाजपामध्ये सामील झालेल्या परनीत कौर यांनी १९९९, २००४, २००९ आणि २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पटियाळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे पती आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने त्यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निलंबित केले होते. 

टॅग्स :punjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाबManish Sisodiaमनीष सिसोदियाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४