“AAP ने खेळ खराब केला, जसा..,” गुजरातमधील काँग्रेसच्या खराब कामगिरीवर चिदंबरम यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 02:35 PM2022-12-11T14:35:59+5:302022-12-11T14:36:31+5:30

आम आदमी पक्षानं सर्व खेळ खराब केल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केलं.

AAP spoils the game p Chidambaram reacts to Congress poor performance in Gujarat vidhansabha election arvind kejriwal | “AAP ने खेळ खराब केला, जसा..,” गुजरातमधील काँग्रेसच्या खराब कामगिरीवर चिदंबरम यांची प्रतिक्रिया

“AAP ने खेळ खराब केला, जसा..,” गुजरातमधील काँग्रेसच्या खराब कामगिरीवर चिदंबरम यांची प्रतिक्रिया

googlenewsNext

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. गुजरातमध्ये काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब राहिली. तर दुसरीकडे हिमाचलमध्ये भाजपकडून सत्ता आपल्याकडे खेचण्यात काँग्रेसला यश आले. पीटीआयशी बोलताना काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि एमसीडीमध्ये भाजपची सत्ता होती, या तीनपैकी दोन निवडणुका हरल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाने (आप) गुजरातमध्ये खेळ खराब केला, तसाच गोवा आणि उत्तराखंडमध्येही केला होता, असेही ते म्हणाले.

उत्तराखंड आणि गोव्याप्रमाणेच गुजरातमध्येही 'आप'ने खेळ खराब केला, तर दिल्लीबाहेर इतर ठिकाणी त्याची लोकप्रियता कमी होते, असे चिदंबरम यांनी नमूद केले. “2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘पोल’ बनण्यासाठी काँग्रेसची स्थिती सर्वोत्तम आहे. ज्याभोवती बिगर-भाजप आघाडी तयार केली जाऊ शकते. गुजरातच्या पराभवातून काँग्रेसने काहीतरी शिकले पाहिजे. मोठ्या निवडणुकांमध्ये गुप्त मोहिमेसारखी कोणतीही गोष्ट नसते,” असेही त्यांनी सांगितले.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा आणि दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) नुकत्याच झालेल्या निवडणुकांबाबत ते म्हणाले की, “तीनही ठिकाणी भाजपची सत्ता होती, पण दोन ठिकाणी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंतन करायला हवे.” “हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. गुजरातमधील विजय महत्त्वाचा आहे, परंतु सत्ताधारी भाजपला हिमाचल प्रदेश आणि एमसीडीमध्ये निर्णायक पराभव पत्करावा लागला हे वास्तव लपवता येणार नाही,” असेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले.

Web Title: AAP spoils the game p Chidambaram reacts to Congress poor performance in Gujarat vidhansabha election arvind kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.