शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपाचा अयोध्येत पराभव झाल्याने मोदी आता जय श्रीराम म्हणत नाहीत, हिंदू धर्माला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:06 IST

AAP Sanjay Singh And Narendra Modi : संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. "भाजपा हा हिंसक विचारधारा असलेला पक्ष आहे. जिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंसक विचारधारेला चालना देण्याचं काम करतात. भाजपाचा अयोध्येत पराभव झाला, त्यामुळे आता त्यांनी जय श्रीराम म्हणणं बंद केलं आहे" असं म्हणत संजय सिंह यांनी निशाणा साधला आहे. 

TV9 च्या रिपोर्टनुसार, आप खासदार म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि भाजपा हिंदू धर्म आणि हिंदू समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहेत. देशाचे पंतप्रधान मुजरा असा शब्द वापरतात. याशिवाय मुघल, मदरसा, मुस्लिम, घुसखोर असे शब्द उघडपण वापरून देशात द्वेष पसरवतात. मला विचारायचं आहे की, हिंदू धर्म म्हणतो धर्माचा विजय झाला पाहिजे, अधर्माचा नाश झाला पाहिजे, सजीवांमध्ये सद्भावना आणि जगाचे कल्याण व्हावे, असे हिंदू धर्म सांगतो. पण भारताचे पंतप्रधान सजीवांमध्ये चुकीची भावना निर्माण करत आहेत.

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह म्हणाले की, "भाजपा आणि पंतप्रधान मोदी यातून अजून शिकलेले नाहीत. त्यामुळे अयोध्या, सुलतानपूर, प्रतापगड, प्रयागराज, श्रावस्ती, कौशांबी, चित्रकूट, रामपूर, सीतापूर आणि नाशिक लोकसभा जागा गमावल्या. भारतातील प्रत्येक ठिकाण धर्माशी संबंधित आहे. तसेच, जे ठिकाण रामाचं आहे तिथून भगवान श्रीरामांनी भाजपाचा निर्धार ओळखून त्यांचा पराभव केला."

संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, दलित, मागासवर्गीय, शेतकरी, पैलवानांना शिवीगाळ करतात. आता भाजपाचे नेते अयोध्येतील जनतेला शिव्या देत आहेत.  पंतप्रधान मोदी जय श्रीराम म्हणत नाहीत. आता ते जय जगन्नाथ म्हणत आहेत. आता या लोकांनी जय श्रीराम म्हणणंही बंद केलं आहे, हे असे स्वार्थी लोक आहेत. तेव्हा अयोध्येने त्यांचा पराभव केला असल्याचं देखील संजय यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAAPआपBJPभाजपाAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर