शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

आई सफाई कामगार असलेल्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आप आमदाराची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:19 IST

Labh Singh Ugoke : रिपोर्ट्सनुसार, आम आदमी पार्टीच्या (AAP) नेते लाभसिंग उगोके यांनीही याच शाळेतून शिक्षण घेतले आहे.

चंडीगड : पंजाबचे (Punjab) नवनियुक्त आमदार लाभसिंग उगोके  (Labh Singh Ugoke) एका शाळेत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे, ते ज्या शाळेच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्या शाळेत त्यांची आई सफाई कामगार म्हणून काम करते.

'मुलगा आमदार झाला याचा खूप आनंद झाला'भदौर विधानसभा मतदारसंघात (Bhadaur Legislative Assembly) पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांचा पराभव करणारे लाभसिंग उगोके त्या शाळेचे प्रमुख पाहुणे होते. जिथे त्यांची आई बलदेव कौर (Baldev Kaur) गेल्या 25 वर्षांपासून काम करत आहेत. बलदेव कौर म्हणाल्या की, ही अतिशय अभिमानाची बाब असून माझा मुलगा आमदार झाला याचा मला खूप आनंद आहे.

लाभसिंग उगोके यांनीही याच शाळेतून शिक्षण घेतले रिपोर्ट्सनुसार, आम आदमी पार्टीच्या (AAP) नेते लाभसिंग उगोके यांनीही याच शाळेतून शिक्षण घेतले आहे. दरम्यान, आपल्या मुलाच्या विजयानंतर बलदेव कौर म्हणाल्या की, आम्ही नेहमीच पैसे मिळवण्यासाठी मेहनत केली आहे. माझ्या मुलाची परिस्थिती कशीही असली तरी मी शाळेत माझे कर्तव्य करत राहीन.

चन्नी यांचा 37 हजारांहून अधिक मतांनी पराभव केलामोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या लाभसिंग उगोके  यांनी भदौर मतदारसंघातून चरणजित सिंग चन्नी यांचा 37,550 मतांनी पराभव केला. ते 2013 मध्ये अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीमध्ये सामील झाले आणि पार्टीच्या रँकमध्ये झपाट्याने पुढे आले. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीने 117 सदस्यांच्या विधानसभेच्या 92 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे.

टॅग्स :AAPआपPunjabपंजाब