शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

AAP CM Candidate For Punjab: हे आहेत 'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, लवकरच होणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 16:28 IST

AAP CM Candidate For Punjab: आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठ्या विजयाचा दावा केला आहे.

चंदीगड:पंजाब विधानसभा निवडणूक 2022 साठी (Punjab Assembly Election 2022) आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party)  मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीच्या बैठकीत आप खासदार भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

मान यांच्या नावावर शिक्कामोर्तब- सूत्र

भगवंत मान आपचे पंजाबमधील सक्रीय नेते असून, त्यांच्या मागे मोठा जनाधार आहे. तसेच, त्यांची ख्याती राज्यात पसरली असल्यामुळे त्यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे. भगवंत मान सध्या पंजाबच्या संगरुर लोकसभा मतदारसंघातून आपचे खासदार आहेत. पंजाबमधील निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्ष सातत्याने राज्यात पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी स्वतः पंजाबमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या आहेत.

आपकडून मोठी आश्वासने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात आम आदमी पक्षाने दिल्लीच्या धर्तीवर अनेक आश्वासने दिली आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास राज्यातील 99 लाख महिलांच्या खात्यात दरमहा 1000 रुपये दिले जातील, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले. ही मदत विधवा आणि वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त दिली जाणार आहे. जर घरात चार महिला असतील तर प्रत्येकाला 1000 रुपये मिळतील.

यासोबतच पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर 24 तासांच्या आत प्रत्येक व्यक्तीला घरगुती वापरासाठी 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासनही आम आदमी पक्षाकडून देण्यात आले आहे. अलीकडेच चंदीगड महानगरपालिकेत 35 पैकी 14 जागांवर AAPने ज्या प्रकारे विजय मिळवला आहे, त्यामुळे पंजाबमधील AAP कार्यकर्ते उत्साहित आहेत.  

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीPunjabपंजाबArvind Kejriwalअरविंद केजरीवाल