शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विधानसभेत AAPच्या आमदारांचा प्रचंड गदारोळ, सर्वच्या सर्व 22 आमदार निलंबित; आतिशी देखील सभागृहाबाहेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:03 IST

हा गदारोळ एवढा वाढला की, शेवटी विधानसभा अध्यक्षा विजेंदर गुप्ता यांनी विरोधीपक्ष नेत्या आतिशी यांच्यासह AAP च्या सर्वच्या सर्व आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित करत, सभागृहाबाहेर केले.

दिल्ली विधानसभेत मंगळवारी प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. नव्हे, सभागृहाचे कामकाजच गदारोळातच सुरू झाले. खरे तर, उपराज्यपालांच्या अभिभाषणादरम्यानच आम आदमी पक्षाच्या आमदारांनी गदारोळ सुरू केला. हा गदारोळ एवढा वाढला की, शेवटी विधानसभा अध्यक्षा विजेंदर गुप्ता यांनी विरोधीपक्ष नेत्या आतिशी यांच्यासह AAP च्या सर्वच्या सर्व आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित करत, सभागृहाबाहेर केले.

आपल्या भाषणात काय म्हणाले उपराज्यपाल ? -आपल्या भाषणात, उपराज्यपाल म्हणाले, "सरकार यमुना, प्रदूषण, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि अनधिकृत वसाहतींचे नियमितीकरण यासह पाच मुख्य गोष्टींवर काम करेल. उपराज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान, भाजप आमदार 'मोदी-मोदी'च्या घोषणा देत असल्याचे दिसून आले.

विधानसभेबाहेर AAP च्या आमदारांचे निर्दश - दरम्यान, सभागृहाबाहेर करण्यात आलेल्या आपच्या आमदारांनी हातात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन विधानसभेबाहेर निदर्शने केली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना आतिशी म्हणाल्या, भाजपने मुख्यमंत्री कार्यालय आणि मंत्र्यांच्या कार्यालयातून बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला आहे. माझा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रश्न आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे झाले आहेत का? याच्या विरोधातच आम आदमी पक्षाने निदर्शन केले आहे." एवढेच नाही तर, "जोवर बाबासाहेबांचा फोटो त्यांच्या जागेवर लावला जात नाही, तोवर आम्ही सभागृहपासून ते रस्त्यापर्यंत निदर्शने करत राहू."

आजच सादर होणार मद्य धोरणासंदर्भातील कॅगचा अहवाल -गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज अर्ध्यातासासाठी स्थगित करण्यात आले. आजच केजरीवाल काळातील मद्य धोरणासंदर्भातील कॅगचा अहवाल विधानसभेत मांडला जाणार आहे. यानंतर आणखी गदारोळ होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीvidhan sabhaविधानसभाAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीAtishiआतिशी