शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 21:05 IST

आप म्हटले आहे की, मार्शल नियुक्ती करण्यासाठी आप कोणत्याही थराला जाऊ शकते.

नवी दिल्ली : दिल्लीत सध्या बस मार्शलच्या नियुक्तीचा मुद्दा चर्चेत आहे. दिल्लीतील आतिशी सरकारने मार्शलच्या नियुक्तीबाबत कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पारित केली आहे. या प्रस्तावात मार्शल नियुक्ती तात्काळ करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाने (आप) म्हटले आहे की, मार्शल नियुक्ती करण्यासाठी आप कोणत्याही थराला जाऊ शकते.

आम आदमी पक्षाच्यावतीने एक्सवर लिहिले की, "बस मार्शलच्या पुनर्स्थापनेसाठी आम आदमी पक्ष कोणत्याही थराला जाईल. जेव्हा भाजपचे आमदार एलजी हाऊसमधून पळून जात होते, तेव्हा मंत्री सौरभ भारद्वाज यांनी त्यांचे पाय पकडले. कठीण संघर्षानंतर भाजप आमदारांना एलजी हाऊसमध्ये नेण्यात आले."

दरम्यान, शनिवारी दिल्ली सचिवालयात जोरदार राजकीय नाट्य घडले. बस मार्शलच्या नोकरीच्या मुद्द्यावर दिल्ली सचिवालयात बैठक झाली. मुख्यमंत्री आतिशी आणि दिल्ली सरकारच्या मंत्र्यांसोबत भाजप आमदारांची बैठक झाली. या बैठकीला बस मार्शलही उपस्थित होते. यावेळी बस मार्शल नियमित करण्याच्या दिल्ली विधानसभेच्या ठरावावर स्वाक्षरी करण्यात आली.

आपने भाजपला एलजी कार्यालयात जाऊन ठरावावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. यावेळी सचिवालयाबाहेर विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता एलजी कार्यालयात जाण्यास इच्छुक नसल्याचे दिसले. यावर दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज आणि इतर आमदारांनी विजेंद्र यांचे पाय धरले. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, भाजपने एलजींना कॅबिनेट प्रस्ताव मंजूर करण्यास सांगितले नाही.

"चेंडू एलजीच्या कोर्टात"मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, काल भाजपच्या शिष्टमंडळाने वेळ मागितली होती. आज सकाळी १०.३० वाजता ही बैठक झाली. आम्ही त्यांना सेवा महत्त्वाच्या तपशीलवार समजावून सांगितल्या. यामध्ये भरती, बस मार्शल कायम करणे आणि नियमित करणे यांचा समावेश आहे. या सर्व सेवाविषयक बाबींचे अधिकार एलजी सक्सेना आणि केंद्र सरकारकडे आहेत. मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत आम्ही हा प्रस्ताव मंजूर केला आहे. आता पुढचे काम भाजपला एलजीमधून निवडून आणण्याचे आहे. आता चेंडू एलजीच्या कोर्टात आहे. पण, ते राजकारण करत आहेत आणि मार्शलला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीAam Admi partyआम आदमी पार्टीAtishiआतिशीBJPभाजपा