शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

‘देश वाचवायचा असेल तर...’ राहुल गांधींबाबत काँग्रेस आणि विरोधकांच्या ऐक्याला आपचं नवं चॅलेन्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 14:00 IST

AAP On Rahul Gandhi : महत्वाचे म्हणजे, या बैठकीदरम्यान, काँग्रेसने संसदेत दिल्ली अध्यादेशाला विरोध केला नाही, तर आप काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांचा भाग होणार नाही, असे म्हणत आपने आपली भूमिका स्पष्ट केली होती. 

केंद्र सरकारच्या दिल्ली अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांचे समर्थन मागत असलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना निशाण्यावर घेतले आहे. काँग्रेसनेराहुल गांधी यांना तिसऱ्या वेळीही नेता म्हणून प्रोजेक्ट करू नये, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. आपच्या प्रवक्ता प्रियंका कक्कड यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे.

ट्विटमध्ये कक्कड म्हणाल्या, “जर देश वाचवायचा असेल तर, सर्वप्रथम काँग्रेसने जाहीर करायला हवे की, ते तिसऱ्यांदाही राहुल गांधींवर डाव लावणार नाही आणि यासाठी विरोधी पक्षांवरही दबाव टाकणार नाही. देश हितासाठी हे संविधान वाचविण्यापेक्षाही महत्वाचे आहे.” प्रियंका कक्कड यांनी हे ट्विट पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर केले आहे. महत्वाचे म्हणजे, या बैठकीदरम्यान, काँग्रेसने संसदेत दिल्ली अध्यादेशाला विरोध केला नाही, तर आप काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांचा भाग होणार नाही, असे म्हणत आपने आपली भूमिका स्पष्ट केली होती. 

विरोधकांच्या बैठकीत उपस्थित झाला दिल्ली अध्यादेशाचा मुद्दा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (२३ जून) पाटणा येथे भाजपच्या विरोधात एकत्रित येण्यासंदर्भात विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकिला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.

बैठकीत काय म्हणाले होते केजरीवाल? -आम आदमी पक्षाच्या (आप) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना जेव्हा बैठकीत बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम अध्यादेशावर भाष्य केले आणि त्यावर पाठिंबा मागितला. काँग्रेसने या अध्यादेशाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे मतभेद आणि मनभेद दूर व्हावेत यासाठी अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधींना चहापानावर भेटण्याची विनंती केली, पण राहुल गांधी यांनी नाकार दिला होता.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी