शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपनंतर 'आप'नेही खेळले महिला कार्ड...आतिशी बनल्या दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 15:25 IST

24 फेब्रुवारीपासून दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे.

AAP Leader of Opposition: नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. निवडणुकीत अरविंद केजरीवाल अन् मनीष सिसोदियांसारखे दिग्गज पराभूत झाले. या पराभवाने 13 वर्षांपासून सत्तेत असलेला आप विरोधी बाकावर आला आहे. दरम्यान, आपकडून माजी मुख्यमंत्री आतिशी यांना विरोधी पक्षनेता करण्यात आले आहे. रविवारी पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. 

पक्षाचा पराभव झाला पण आतिशी यांनी जागा वाचवलीविधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांसारख्या मोठ्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण कालकाजींपासून आपली जागा वाचवण्यात आतिशी यशस्वी ठरल्या. पक्षातील तगडा महिला चेहरा असल्याने आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. आम आदमी पार्टीने महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासमोर विरोधी पक्षाचा महिला चेहरा म्हणून आतिशी यांची निवड केली आहे. 

काय म्हणाल्या आतिशी?विरोधी पक्षनेत्या बनल्यावर अतिशी म्हणाल्या की, दिल्लीच्या जनतेने आम आदमी पार्टीला विरोधाची भूमिका दिली आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. भाजपने दिल्लीतील जनतेला दिलेली आश्वासने आम आदमी पार्टी पूर्ण करून घेईल. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत 2500 रुपये मंजूर होतील, ही मोदीजींची हमी होती पण ती पूर्ण झाली नाही. सीएम रेखा गुप्ता यांच्याकडून 2500 हजार रुपये मिळतील, असे आश्वासन दिल्लीच्या जनतेला देण्यात आले होते. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत, हा आमच्या अजेंड्याच्या शीर्षस्थानी आहे. आप सरकारने केलेली कामे बंद पाडण्याचा प्रयत्न झाला तर दिल्लीच्या हक्कासाठी आम्ही लढू.

24 फेब्रुवारीपासून विधानसभेचे अधिवेशन दिल्लीच्या आठव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन सोमवार 24 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 27 फेब्रुवारीला संपेल. या अधिवेशनात आम आदमी पार्टीच्या मागील सरकारच्या कामगिरीवर कॅगचे 14 प्रलंबित अहवालही सादर केले जाणार आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना सभागृहाला संबोधित करतील आणि कॅगचे 14 अहवाल सादर केले जातील. यानंतर उपराज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल.

27 फेब्रुवारी रोजी उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार 27 फेब्रुवारी रोजी आभारप्रदर्शनावर चर्चा सुरू राहील. त्याच दिवशी उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. भाजपने ज्येष्ठ आमदार विजेंद्र गुप्ता आणि मोहन सिंग बिश्त यांना अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. 24 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री रेखा गुप्ता विजेंद्र गुप्ता यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडणार असून त्याला मनजिंदर सिंग सिरसा पाठिंबा देतील.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपAtishiआतिशीBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल