शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"मुलगा नापास झाला तर तुम्ही त्याला शाळेत पाठवणं बंद करता का?"; आप नेत्याचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 11:27 IST

प्रेम सिंह 68 वर्षांचे असून त्यांना तीन मुलं आहेत. ते मजूर म्हणून काम करतात.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने तिकीट न दिल्याने निराश झालेल्या प्रेम सिंह यांनी एकदा मुलगा नापास झाला तर तुम्ही त्याला शाळेत पाठवणे बंद करता का? असा सवाल विचारला आहे. आप जोधपूरमधील 9 जागांपैकी फक्त एक जागा लढवत आहे. आपने 2018 साली जोधपूरच्या लूनी मतदारसंघातून प्रेम सिंह यांना तिकीट दिले होते, ज्यामध्ये त्यांना 898 मते मिळाली होती. त्यांनी याआधी दोनदा विधानसभेची निवडणूक लढवली होती.

सरपंचपदाची निवडणूकही लढवली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. प्रेम सिंह 68 वर्षांचे असून त्यांना तीन मुलं आहेत. ते मजूर म्हणून काम करतात. लूनी मतदारसंघातून ते तीनदा पराभूत झाले आहेत. पराभवानंतरही गेली पाच वर्षे अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचा प्रचार करत असल्याचं प्रेम सिंह सांगतात. 

बिछाना सायकलवरून घेऊन ते प्रवास करतात. ते म्हणाले, पक्षाच्या हायकमांडने मला पुन्हा तिकीट देण्याचं आश्वासन दिलेलं, मात्र जोधपूर शहर वगळता पक्षाने एकही उमेदवार उभा केला नाही. आप 9 पैकी फक्त एका जागेवर निवडणूक लढवत आहे.

"मी निराश आहे कारण..."

"मी आता निराश झालो आहे कारण मला पुन्हा निवडणूक लढवायची होती आणि यावेळी मी पक्षासाठी कठोर परिश्रम केले होते. निराश असूनही मी आपचा कार्यकर्ता म्हणून राहीन आणि लोकांच्या सतत संपर्कात असेन" असं प्रेम सिंह यांनी म्हटलं आहे. वारंवार पराभूत होऊनही त्याने आपली "मोहिम" का सुरू ठेवली असे विचारलं असता, त्यांनी उत्तर दिलं की, "मुलगा नापास झाला तर तुम्ही त्याला शाळेत पाठवणार नाही का?"

जोधपूरचे आप कार्यकर्ता पंकज वाघेला म्हणाले, "प्रेम सिंह हे एक समर्पित कार्यकर्ते आहेत. प्रत्येकाने त्यांना त्यांच्या मतदारसंघात प्रचार करताना पाहिलं आहे. मी त्यांना लूनी मतदारसंघातील प्रत्येक गावात सायकल चालवताना पाहिलं आहे आणि ते एक लोकप्रिय चेहरा आहेत. त्यांना तिकीट मिळालं असतं पण पक्षाने यावेळी उमेदवार दिला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :AAPआपRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक