शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

‘आप’ सरकारमुळे निर्भयाच्या दोषींना फाशीस विलंब -जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 02:31 IST

सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर आप सरकारने दोषींना आठवड्याभरात नोटिसा द्यायला हव्या होत्या. तसे झाले असते, तर या आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची याआधीच अंमलबजावणी झाली असती.

नवी दिल्ली : दिल्लीतील ‘आप’ सरकारच्या निष्काळजीमुळेच निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्यास विलंब होत आहे, असा आरोप माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. फाशीची शिक्षा रद्द करण्याचा आरोपींचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने २०१७ साली फेटाळून लावला. त्यानंतर या आरोपींना नोटीस देण्यास आप सरकारने अडीच वर्षे लावली, असेही त्यांनी सांगितले.

जावडेकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर आप सरकारने दोषींना आठवड्याभरात नोटिसा द्यायला हव्या होत्या. तसे झाले असते, तर या आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची याआधीच अंमलबजावणी झाली असती. दिल्लीमध्ये १९८४ साली शीखविरोधी दंगल घडविणाऱ्यांना काँग्रेसने पाठीशी घातले, असा आरोप प्रकाश जावडेकर यांनी एसआयटी अहवालाच्या आधारे केला आहे. ते म्हणाले की, या दंगलीमध्ये बळी पडलेल्यांच्या वारसदारांना न्याय मिळावा म्हणून काँग्रेसने काहीही केले नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस.एन. धिंग्रा हे प्रमुख असलेल्या एसआयटी पथकाने शीखविरोधी दंगलीचा तपास करून अहवाल सादर केला होता. ही केवळ दंगल नव्हती, तर शिखांचे अत्यंत निर्घृणरीत्या केलेले हत्याकांड होते.एकाचा अर्ज फेटाळला२०१२ साली दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींपैकी मुकेश सिंह याने केलेला दयेचा अर्ज फेटाळण्याची शिफारस दिल्ली सरकारने बुधवारी केली. ती शिफारस तातडीने नायब राज्यपालांकडे पाठविण्यात आली, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. मुकेश सिंह याने दयेचा अर्ज केला असल्याने या आरोपींना २२ जानेवारी रोजी फाशी देता येणार नाही, असे आप सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला याआधी सांगितले होते. मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षयकुमार सिंह, पवन गुप्ता, अशी या चार आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपBJPभाजपाAAPआप