शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील भाजपच्या कार्यालयावर 'आप' सरकारची कारवाई; ठोकला 5 लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 15:40 IST

नवी दिल्लीतील डीडीयू मार्गावरील भाजपच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत सत्ताधारी आप आणि भाजपमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. आता पुन्हा एकदा दोन्ही पक्ष आमने-सामने येण्याची शक्यता आहे. केजरीवाल सरकारने भाजपच्या निर्माणाधीन कार्यालयावर सुरू असलेले बांधकाम थांबवले आहे. तसेच, भाजपवर 5 लाखांचा दंडही ठोकला आहे. केजरीवाल सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ही कारवाई केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील डीडीयू मार्गावरील भाजपच्या बांधकाम सुरू असलेल्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम आणि पाडकामाच्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय अचानक पाहणी करण्यासाठी आले होते. यादरम्यान राय यांनी दंडात्मक कारवाई केली. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी छापा टाकण्यापूर्वी बांधकाम साइटच्या गेटवर 'भारतीय जनता पार्टी सभागृह' असे लिहिले होते. छापा टाकल्यानंतर घाईघाईने नाव झाकण्यात आले.

दिल्लीत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू दिल्लीतील प्रदूषण पाहता सीक्यूएएमच्या आदेशानुसार तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम आणि पाडकामांवर बंदी घालण्यात आली आहे. बांधकाम कामांवर देखरेख ठेवण्यासाठी 586 पथके स्थापन करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर 521 वॉटर स्प्रिगलिंग मशीन, 233 अँटी स्मॉग गन, 150 मोबाईल अँटी स्मॉग गनच्या सहाय्याने पाण्याची फवारणी केली जात आहे.

AQI 400 पार राजधानीत वाढत्या प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. दिल्लीतील अनेक भागात मंगळवारी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 400 च्या वर आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणापासून अद्याप दिलासा मिळण्याची आशा नाही. किंबहुना, नोव्हेंबरमध्ये भात पिकांची कापणी जास्त असल्याने, प्रदूषणात वाढ होऊ शकते. यामुळे दिल्लीच्या हवेतील प्रदूषणाची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपा