शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
6
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
7
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
8
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
9
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
10
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
11
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
12
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
13
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
14
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
15
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
16
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
17
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
18
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
19
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
20
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

मंत्र्यांच्या ‘विनिंग पॉवर’मधून ‘आप’ने शोधला दिल्लीचा मार्ग

By प्रसाद आर्वीकर | Published: April 15, 2024 5:59 AM

राज्यात केलेल्या विकासकामांच्या बळावर लोकसभा काबीज करण्याची ‘आप’ची रणनीती कितपत यशस्वी होते, याची सध्या तरी उत्सुकता आहे.

प्रसाद आर्वीकर, लोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : राज्यात असलेल्या सत्तेचा फायदा घेऊन लोकसभा काबीज करण्याचे मनसुबे बांधत पंजाबमध्येआम आदमी पार्टीने राज्य मंत्रिमंडळातील पाच कॅबिनेट मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. राज्यात केलेल्या विकासकामांच्या बळावर लोकसभा काबीज करण्याची ‘आप’ची रणनीती कितपत यशस्वी होते, याची सध्या तरी उत्सुकता आहे.

निवडणुकांचा शेवटचा टप्पा असल्याने इतर पक्षांनी अजून तरी येथे गडबड केलेली नाही. मात्र, आम आदमी पार्टीने रणनीती निश्चित केली आहे. एक वर्षांत आपने लोकहिताची अनेक कामे केल्याचा दावा केला आहे. ही कामे लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच पद्धतीची विकासकामे लोकसभेच्या माध्यमातून केली जातील, हे पटवून द्या, असे निर्देश मुख्यमंत्र मान आणि आपचे पंजाब प्रभारी पाठक यांनी उमेदवारांना दिले आहेत.

पंजाबमधील लोकसभा निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावरच आहे. त्यामुळे मागच्या आठवडापासून भगवंत मान हे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेऊन आपच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

दगाफटका होऊ नये विधानसभेच्या भरवशावरच आपने राज्यात स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये या उद्देशाने थेट मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांनाच लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्या त्या मतदारसंघात मंत्र्यांच्या ‘विनिंग पॉवर’चा वापर आपने केला आहे.

लढतीतील कॅबिनेट मंत्रीमतदारसंघ    उमेदवारअमृतसर    कुलदीप धालीवालखडूर साहिब    लालजित भुल्लरबठिंडा    गुरुमितसिंह खुड्डियासंगरुर    गुरुमीतसिंह मीत हेयरपटियाला    डॉ. बलबीर सिंह

पंजाबी ॲक्टर अनमोलही...मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निकटवर्ती ओळखले जाणारे पंजाबी कलाकार कर्मजित अनमोल यांना फरीदकोट या राखीव मतदारसंघातून आपने उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी शैक्षणिक जीवनापासून त्यांची मैत्री आहे.

भाजपने आयात करून दिले उमेदवार- भाजपने ६ उमेदवारांच्या नावांची घोषणा येथे केली आहे. त्यातील बहुतांश उमेदवार हे काँग्रेस आणि आपमधून आयात केेलेले आहेत.- २०१९ च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत मात्र स्वकीयांशीच लढावे लागणार आहे. - पंजाबमध्ये शेवटच्या टप्प्यात निवडणूक होणार असल्याने उमेदवार जाहीर करण्यासाठी पुरेसा वेळ घेतला जात आहे.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीPunjabपंजाबlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४