शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत आप, भाजप अन् काँग्रेसमध्ये सामना; राजकीय घडामोडींमुळे थंडीतही राजधानीचा उष्मांक वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:47 IST

दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही राजकीय घडामोडींमुळे देशाच्या राजधानीचा उष्मांक वाढला आहे.

- चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा मुख्य सामना देशातील तीन राष्ट्रीय पक्षांमध्ये होणार असला, तरी आम आदमी पक्षाने सध्या प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही राजकीय घडामोडींमुळे देशाच्या राजधानीचा उष्मांक वाढला आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष दिल्लीची सत्ता तिसऱ्यांदा मिळविण्यासाठी मैदानात उतरला आहे. तर, भारतीय जनता पक्षाने २७ वर्षांचा वनवास संपविण्यासाठी कंबर कसली आहे. कॉंग्रेसही मैदानात आहे. परंतु, फारशी सक्रियता दिसून येत नाही.

भारतीय जनता पक्ष मागील २७ वर्षांपासून दिल्लीच्या सिंहासनावर बसण्याची प्रतीक्षा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण कॅबिनेट आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री भाजपचा प्रचार करण्यासाठी दिल्लीच्या मैदानात उतरणार आहे. गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपशासित राज्यांचे १२ मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार आहेत. 

आम आदमी पक्षाने प्रचार कसा करायचा?, यावर कार्यकर्त्यांना ९० मिनिटांचे प्रशिक्षण दिली आहे. प्रत्येक बुथवर १५ ते २० कार्यकर्ते तैनात केले आहेत. बुथवरील मतदारांपर्यंत पोहचणे ही त्यांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री आतिशी मर्लोना यांच्याशिवाय माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह खासदार व आमदारांच्या खांद्यावर वेगवेगळ्या मतदारसंघांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. 

२०२० ची आकडेवारी २०२० मधील निवडणुकीत आम आदमी पक्षाला ५३.५७ टक्के मतांसह ६२ जागा मिळाल्या, तर भाजपला ८ जागांसह एकूण ३८.५१ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला ४.२६ टक्के मते मिळाली होती, परंतु एकही आमदार निवडून आला नव्हता. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्लीAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस