शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

महाबैठकीनंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून AAP गायब; काय आहे इनसाईड स्टोरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 18:04 IST

देशभरातील १५ विरोधी पक्षांची महाबैठक आज बिहारची राजधानी पाटणा येथे झाली

पाटणा - भाजपा सरकारविरोधात एकजुटीचा नारा देणाऱ्या विरोधी पक्षांना मोठा झटका लागला आहे. विरोधकांच्या पहिल्याच बैठकीत काँग्रेस-आम आदमी पक्ष यांच्यात कुरघोडी पाहायला मिळाली. बैठकीनंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेला आम आदमी पक्षाने दांडी मारली. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता केजरीवाल यांचे प्लेन होते, त्यामुळे ते दिल्लीला निघून गेले असं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले. 

देशभरातील १५ विरोधी पक्षांची महाबैठक आज बिहारची राजधानी पाटणा येथे झाली. पाटण्यात होत असलेल्या या बैठकीला २७ प्रमुख नेते उपस्थित होते. जवळपास ४ तासाहून अधिक ही बैठक झाली. त्यात आम आदमी पक्षानेही सहभाग घेतला. त्या बैठकीत काँग्रेस-आपमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्या बैठकीनंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली. परंतु त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित नव्हते. 

अरविंद केजरीवाल घेणार पत्रकार परिषद  आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित न राहता स्वतंत्र पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेससोबतच्या वादावर बोलतील. याआधीही केजरीवालांनी म्हटलं होते की, जर काँग्रेसने दिल्लीतील अध्यादेशाचा विरोध केला नाही तर आप पाटण्यात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार नाही. 

अध्यादेशावर पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार निर्णयदिल्ली सेवा अध्यादेशावर आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घेतला जाईल. यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, कदाचित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना माहिती नसावे, अध्यादेशाचा विरोध अथवा समर्थन संसदेच्या बाहेर होत नाही. संसदेच्या आत होते. संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष मिळून अजेंडा बनवतात. १८-२० पक्षांची बैठक होते. ज्यात प्रत्येक पक्षाचा नेता उपस्थित असतो. या अध्यादेशाबाबत बाहेर इतका प्रचार का केला जातोय हे माहिती नाही. अध्यादेशाबाबत निर्णय संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपcongressकाँग्रेस