शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal: माझ्या फक्त पाच मागण्या मान्य करा, मी राजकारण सोडेन; अरविंद केजरीवाल यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 15:24 IST

अरविंद केजरीवाल यांनी इतर विरोधी पक्षांसह भाजपवर निशाणा साधला.

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी हरयाणातील जींद दौऱ्यावर होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते मोर्चेबांधणी करत आहेत. त्यांनी जींद येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. केजरीवाल यांनी यावेळी इतर विरोधी पक्षांसह भाजपवर निशाणा साधला. याशिवाय सरकारने माझ्या पाच मागण्या मान्य केल्यास राजकारण सोडेन असे आव्हान दिले. केजरीवाल यांच्या पाच मागण्यांमध्ये चांगले शिक्षण, उपचार, कमी महागाई, रोजगार आणि गरिबांना मोफत वीज यांचा समावेश आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह पंजाबचे मुख्यमंत्री देखील मंचावर उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, माझ्या पाच मागण्या आहेत, या केवळ माझ्याच नाहीत तर १४० कोटी देशवासियांच्या मागण्या आहेत. माझ्या पाच मागण्या पूर्ण करा, मी राजकारण सोडेन. मी इथे सत्तेसाठी आलो नाही, मी मंत्री किंवा मुख्यमंत्री बनण्यासाठी आलो नाही आणि पैसा कमावण्यासाठीही आलो नाही. मी १४० कोटी जनतेच्या वतीने जिंदच्या व्यासपीठावरून ही मागणी करत आहे.

केजरीवाल यांच्या पाच प्रमुख मागण्या 

  1. देशातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करा, सर्वांना समान शिक्षण द्या.
  2. प्रत्येक नागरिकासाठी चांगल्या उपचाराची व्यवस्था करा.
  3. महागाई कमी करा, आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये हे करून दाखवले आहे.
  4. प्रत्येक हाताला, तरूणाराला रोजगार उपलब्ध करून द्या.
  5. गरिबांना मोफत वीज द्या, सर्वांना २४ तास वीज द्या.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ईडी-सीबीआय आणि दिल्ली पोलीस माझ्या मागे लागले आहेत जणू काय मी दहशतवादी आहे. मी दहशतवादी नाही, हे दहशतवादी आहेत ज्यांनी प्रत्येक घरात महागाईची दहशत पसरवली आहे. आज उपचार घेणे किती महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेल महागले कारण तेल कंपन्या त्यांचे मित्र चालवत आहेत. आज वीज महाग आहे कारण ती वीज कंपन्यांच्या आदेशानुसार आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा