शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:18 IST

लंडनला आपल्या मुलीला भेटायला जाण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. या हृदयद्रावक घटनेमुळे अंजू यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अहमदाबाद येथील विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला असून, यात हरियाणातील कुरुक्षेत्र येथील रहिवासी अंजू शर्मा यांचाही समावेश आहे. लंडनला आपल्या मुलीला भेटायला जाण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. या हृदयद्रावक घटनेमुळे अंजू यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

या अपघातापूर्वी अंजू यांनी सोशल मीडियावर "आदमी खिलौना है" अशी एक पोस्ट केली होती, जी पाहून शोकाकुल कुटुंबियांना असे वाटत आहे की, त्यांना कदाचित आपल्या मृत्यूची पूर्वकल्पना आली असावी.

मुलीला भेटायला लंडनला निघालेल्या...

अंजू शर्मा त्यांची मुलगी निम्मी शर्माला भेटण्यासाठी लंडनला जात होत्या. निवृत्त सैनिक जगदीश शर्मा यांची कन्या असलेल्या अंजू यांचे लग्न पंजाबमधील पटियाला जिल्ह्यात झाले होते, परंतु त्या गुजरातमधील वडोदरा येथे राहत होत्या. त्यांचे दिवंगत पती लोकर उद्योगात कार्यरत होते. अंजू या चित्रपट अभिनेता मिलन शर्मा यांच्या बहीण होत्या. त्यांची मोठी मुलगी लंडनमध्ये राहते, तर धाकटी मुलगी वडोदरा येथे वास्तव्यास आहे.

चार दिन की जिंदगी से अच्छे हैं, जिंदगी के दो चार पल!

अंजू शर्मा यांच्या एका नातेवाईकाने सांगितले की, त्यांनी दुपारी १:०६ वाजता एक स्टेटस पोस्ट केले होते, ज्यात लिहिले होते, "चार दिन की जिंदगी से अच्छे हैं, जिंदगी के दो चार पल। आदमी खिलौना है". अंजू यांना स्टेटस पोस्ट करायला खूप आवडायचे. अंजू यांचे नातेवाईक संजीव कुमार यांनी सांगितले की, त्या कुटुंबातील सर्वात मोठ्या होत्या आणि सर्वांची काळजी घेत असत. त्यांच्या निधनाने कुटुंबातील सर्व सदस्य अस्वस्थ असून त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले आहे.

मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू!

एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर विमानाने दुपारी १:३८ वाजता उड्डाण केले. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान वेगाने खाली येऊ लागले आणि विमानतळाजवळील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. कोसळताच विमानात मोठा स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत विमानात उपस्थित असलेल्या सर्व लोकांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहांची स्थिती अत्यंत वाईट असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. नातेवाईकांकडून डीएनए नमुने घेऊन ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात