शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातील भारतीयांच्या लग्नासाठी आता आधार कार्ड होणार गरजेचं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 18:22 IST

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला एका तज्ज्ञांच्या समितीनं परदेशात राहणा-या भारतीय लोकांच्या लग्नासाठी आधार कार्ड गरजेचं करण्याची शिफारस केली आहे. परदेशात राहणा-या जोडप्याच्या लग्नाची नोंदणी भारतात होण्यासाठी आधार अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. पती व पत्नीमध्ये कोणताही वादविवाद झाल्यास प्रकरण योग्यरीत्या हाताळण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीनं ही शिफारस केली आहे.

नवी दिल्ली, दि. 14 - भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला एका तज्ज्ञांच्या समितीनं परदेशात राहणा-या भारतीय लोकांच्या लग्नासाठी आधार कार्ड गरजेचं करण्याची शिफारस केली आहे. परदेशात राहणा-या जोडप्याच्या लग्नाची नोंदणी भारतात होण्यासाठी आधार अनिवार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. पती व पत्नीमध्ये कोणताही वादविवाद झाल्यास प्रकरण योग्यरीत्या हाताळण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीनं ही शिफारस केली आहे.परदेशात एनआरआय पतींकडून भारतीय महिलांचा छळ होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तसेच महिला घरगुती हिंसाचाराच्याही शिकार होत आहेत. आधार सक्तीचे केल्यास अशा महिलांना त्यांचे अधिकार मिळणार आहेत. त्यामुळेच तज्ज्ञांच्या विशेष समितीनं हा प्रस्ताव ठेवला आहे. यासंदर्भात 30 ऑगस्ट रोजी परराष्ट्र मंत्रालयात एक रिपोर्टही जमा करण्यात आली आहे. तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचं यासाठी एक धोरण बनवण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. ते धोरण अंमलात आल्यास परदेशात घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरणा-या महिलांना न्याय मिळणार आहे. या धोरणानुसार घरगुती हिंसा करणा-या पतीला प्रत्यार्पण करून भारताल्या तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. परदेशातील व्यक्तीशी लग्न केल्यानंतर छळणुकीच्या प्रकरणात आरोपीला थांगपत्ता लावण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागते. परदेशातील पतीचा पत्ता नसल्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यातही अडचणी येतात. 

शासन नियमानुसार 30 दिवसांच्या आत लग्नाची नोंदणी करणं आवश्यक असतं. या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जात नाही. मात्र आता तुम्हाला विवाह नोंदणी करण्याशिवाय गत्यंतर नाही. लग्न झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत विवाह नोंदणी करणे लवकरच बंधनकारक करण्यात येणार असून, या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच विवाह नोंदणी करण्यास टाळाटाळ करणा-यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.

कायदा आयोगाने याबाबत केंद्र सरकारला दिलेल्या अहवालामध्ये विवाह नोंदणी बंधनकारक करण्याची मागणी केलीय. त्याप्रमाणेच कोणत्याही ठोस कारणांशिवाय विवाह नोंदणीमध्ये उशीर झाला, तर प्रतिदिन 5 रुपये दंड आकारला जाण्याचीही शक्यता आहे. रिपोर्टनुसार वेळेत विवाह नोंदणी न केल्यास प्रतिदिन कमीत कमी 5 रुपये आणि जास्तीत जास्त 100 रुपये दंड आकारण्याचं प्रस्तावित आहे. विवाह नोंदणी बंधनकारक केल्यानं जबरदस्ती होणारे विवाह आणि बालविवाह रोखण्यासाठी मदत होणार असल्याचाही कायदा आयोगाचा कयास आहे. त्याप्रमाणेच लैंगिक समानता आणि महिलांच्या सशक्तीकरणाला मदत मिळणार असल्याचंही कायदा आयोगानं स्पष्ट केलं आहे.