शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल सिमसाठी आधारसक्ती नाही; सरकारचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 09:27 IST

इतर ओळखपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेता येणार

नवी दिल्ली: आता मोबाइल सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आधार कार्डची गरज भासणार नाही. सिम कार्डची विक्री करताना ग्राहकाकडून वाहन चालक परवाना, पासपोर्ट आणि मतदान ओळखपत्र स्वीकारण्याचे आदेश सरकारनं मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सना दिले आहेत. कंपन्यांनी या आदेशांची त्वरित अंमलबजावणी करावी, अशा सूचना दूरसंचार सचिव अरुण सुंदराजन यांनी दिल्या आहेत. ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, याची काळजी घेण्याची सूचना सरकारकडून कंपन्यांना करण्यात आलीय.आधार कार्ड नसलेल्या लोकांना सिम कार्ड मिळत नसल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालं होतं. त्यानंतर आधार कार्डव्यतिरिक्त इतर ओळखपत्रांच्या आधारे सिम कार्ड देण्याच्या सूचना सरकारनं मोबाइल ऑपरेटर्सना केली. जोपर्यंत या प्रकरणात अंतिम निर्णय दिला जात नाही, तोपर्यंत सिम कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य असणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं आधीच स्पष्ट केलंय. याबद्दल दूरसंचार सचिव अरुण सुंदराजन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राकडे प्रतिक्रिया दिली. 'एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसल्यास त्याला सिम कार्ड नाकारु नका, अशा सूचना दूरसंचार मंत्रालयाकडून सर्व टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. ग्राहकाकडून इतर ओळखपत्र स्वीकारणाच्या सूचना कंपन्यांना करण्यात आल्या आहेत,' असं सुंदरराजन यांनी म्हटलं. दूरसंचार विभागानं आधी दिलेल्या आदेशांमुळे मोबाइल कंपन्या सिम कार्ड देताना आधार कार्डची मागणी करायच्या. लोकनिती फाऊंडेशन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर दूरसंचार विभागानं सिम कार्डसाठी आधार कार्ड आवश्यक केलं होतं. मात्र सिम कार्डसाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचा कोणताही निकाल आपण दिला नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यामुळेच आता दूरसंचार विभागानं आधार कार्डऐवजी इतर ओळखपत्रांच्या आधारे सिम कार्ड देण्याच्या सूचना मोबाइल नेटवर्क ऑपरेटर्सना केल्या आहेत. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड