शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड अनेक वेळा बदलता येणार नाही, आधारमधील कोणते तपशील किती वेळा तुम्ही अपडेट करू शकता? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 10:08 IST

Aadhaar card:

लोकमत न्यूज नेटवर्क : जर तुम्ही असा विचार करत असाल की तुम्ही  आधार कार्डमध्ये तुमचे नाव आणि जन्मतारीख पुन्हा पुन्हा बदलू शकता, तर ते चुकीचे आहे. आधारमधील कोणते तपशील किती वेळा तुम्ही अपडेट करू शकता ते पाहू...

नाव फक्त दोनदा अपडेट करता येतेतुम्ही आधारमध्ये तुमचे नाव फक्त दोनदा अपडेट किंवा बदलू शकता. जन्मतारीख तुम्ही केवळ एकदाच बदलू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही पत्त्याबद्दल बोललात, तर तुम्ही तो कितीही वेळा अपडेट करू शकता.

लिंग बदलही करू शकताजर तुम्हाला लिंग म्हणजेच जेंडरमध्ये काही बदल हवा असेल तर त्यासाठीही एक वेळची सुविधा आहे. तुम्ही ते एकदा बदलू शकता.

कुठे संपर्क कराल?प्रथम तुम्हाला आधारच्या प्रादेशिक कार्यालयाला भेट किंवा help@uidai.gov.in ला ई-मेल करावा लागेल. मग तुम्हाला बदल का करायचा आहे त्याचे कारण स्पष्ट करावे लागेल. त्यानंतर त्याच्याशी संबंधित तपशील आणि त्याचे पुरावे द्यावे लागतील. तुमच्याकडे योग्य कारण असेल तरच त्याला मान्यता दिली जाईल, अन्यथा तुमची विनंती फेटाळली जाईल.

मर्यादेपेक्षा जास्त बदल करण्यासाठी काय करावे लागेल?जर तुम्हाला नाव, जन्मतारीख आणि लिंग अनेकवेळा बदलायचे असेल तर ते शक्य आहे; परंतु त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती असेल तरच हा बदल करण्यात येईल. यासाठी तुम्हाला पुन्हा आधारच्या प्रादेशिक कार्यालयात जावे लागेल.

किती द्यावे लागेल शुल्क?आधार कार्डमध्ये बदल करताना तुम्हाला थोडे शुल्कही द्यावे लागेल. उदाहरणार्थ, बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला १०० रुपये भरावे लागतील, तर डेमोग्राफिक अपडेटसाठी तुम्हाला ५० रुपये द्यावे लागतील. रंगीत आधार डाऊनलोड करण्यासाठी ३० रुपये शुल्क भरावे लागेल.

मोबाइल नंबर अपडेट करणे आवश्यकजर योग्य मोबाइल नंबर आधार कार्डमध्ये अपडेट केलेला नसेल, तर प्रथम तुम्हाला तो अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागेल. जर मोबाइल नंबर अपडेट केला असेल तर तुम्ही ऑनलाइन काही बदल करू शकता.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड