शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Special Gift: प्रेमासाठी कायपण! प्रियकराने प्रेयसीच्या नावाने बनवलं चक्क 'गुलाब गार्डन', सर्वत्र होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 17:29 IST

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून देखील ओळखला जातो.

गाझियाबाद : फेब्रुवारी महिना हा प्रेम व्यक्त करण्याचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. हा महिना जगभरातील जोडप्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. व्हॅलेंटाईन म्हणजेच प्रेमाचा दिवस 14 फेब्रुवारीला सर्वत्र साजरा केला जातो. पण या दिवसाच्या आधी प्रेम अधिक घट्ट करण्यासाठी आठवडाभर विविध दिवस साजरे केले जातात. जगभरातील कपल्स आपल्या जोडीदाराला विविध भेटवस्तू देऊन हा महिना अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असतात. 

दरम्यान, उत्तर प्रदेशातील गाझिबाद येथील तरूणाने आपल्या प्रेयसीला एक अनोखी भेट देऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. इथे प्रियकराने त्याच्या प्रेयसीच्या नावाने चक्क गुलाब गार्डन तयार केले असून त्याला 'श्रिया गुलाब उपवन' असे नाव दिले आहे.

श्रिया गुलाब गार्डनची कहाणी ज्या क्षेत्रात ही गुलाबाची बाग बनवली आहे त्याची देखरेख पर्यावरणप्रेमी प्रदीप धालिया हा तरूण करतो. प्रदीपने एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, एकदा एक मुलगा त्याच्याकडे आला, त्याने त्याच्या प्रेयसीच्या नावाने पर्यावरणासाठी संदेश देण्याची कल्पना सुचवली. प्रदीपला ही कल्पना आवडली मग त्याने मिळून ही गुलाबाची बाग तयार केली ज्याला एकूण 8 महिने लागले. 

सर्वत्र होतंय कौतुक प्रदीप आपल्या शेतातील रोपटे लोकांना वृक्षारोपणासाठी मोफत देतो. या बागेत लावलेले सुंदर गुलाब सर्वांना आकर्षित करतात. मात्र, प्रदीपला प्रेयसीने आपली ओळख गुप्त ठेवण्यास सांगितले आहे. प्रेयसीला अनोखी भेट देणारी ही कहाणी अनेकांना आकर्षित करत आहे. प्रदीपने सांगितले की, त्याची प्रेयसी त्याला नेहमी सांगते की जेव्हा जेव्हा लोक ही बाग पाहतील किंवा येथून गुलाब तोडतील तसतसे आपले प्रेम आणखी बहरत जाईल. प्रेमवेड्या तरूणाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याने यामाध्यमातून पर्यावरणाचे सरंक्षण करण्याचे आवाहन केले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशValentine Weekव्हॅलेंटाईन वीकValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट