शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

हमारी अधुरी कहानी! प्रेयसीच्या घरासमोरच प्रियकरानं संपवलं जीवन; व्हिडीओमध्ये म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 18:12 IST

गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची मागणी होत असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अहमदाबाद: प्रेम म्हणजे खेळ भावनांचा... भावना दुखावल्याने कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची मागणी होत असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील भावनगरमधील प्रेमभंग झालेल्या युवकाने जे केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. भावनगर येथील या तरूणाचे एका तरूणीवर प्रेम होते पण प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने व्यथित झालेल्या तरूणाने अखेरचा व्हिडीओ बनवून जीवनयात्रा संपवली. 

आत्महत्या करण्यापूर्वी मृत तरूणाने व्हिडीओ करत सर्व लोकांची नावे घेतली आणि नंतर प्रेयसीच्या घराबाहेर विष पिऊन आत्महत्या केली. भावनगरमधून समोर आलेला हा प्रेम कहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची दखल घेत भावनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

अखेरचा व्हिडीओ अन् अखेरचा श्वास स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावनगर जिल्ह्यातील झेलई येथील रहिवासी असलेल्या रोशन तलावियाचे जवळच्या एका गावातील मुलीवर प्रेम होते. रोशन आणि त्याची प्रेयसी यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला अन् ते दोघेही रोशनच्या घरी राहायला आले. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाचे आमिष दाखवून मुलीला माघारी घरी नेले. मात्र, नंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिल्याने रोशनने जीवन संपवले. प्रेयसीच्या घरासमोर विष प्राशन करून रोशनने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणाने व्हिडीओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने दोन -तीन लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  रोशन तलावियाने आत्महत्यापूर्वी केलेल्या व्हिडीओत सांगितले की, विजयभाई आणि संजय या दोघांमुळे मी आत्महत्या करत आहे. त्या दोघांनी मला फसवले. मला लग्न करू दिले नाही. जेव्हा आम्ही दोघे पळून गेलो तेव्हा त्यांनी सांगितले होते की, तुमचे दहा दिवसांत लग्न होईल, परंतु २ महिने झाले तरी लग्न झाले नाही, म्हणून मी आत्महत्या करत असून त्यांना तुरूंगात पाठवत आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातahmedabadअहमदाबादLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यू