शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळ येण्यापूर्वीच 'बिपरजॉय'चा जन्म; महिलेने चिमुकलीचे ठेवले नाव, शेल्टर होममध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 17:07 IST

अवघ्या जगाचे लक्ष वेधणारे बिपरजॉय वादळ गुजरातच्या किनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर आहे.

अवघ्या जगाचे लक्ष वेधणारे बिपरजॉय वादळ गुजरातच्या किनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. आज रात्रीपर्यंत हे वादळ गुजरात किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. पण या वादळाच्या आगमनापूर्वीच 'बिपरजॉय'चा जन्म झाला अन् एका माऊलीच्या चेहऱ्यावर आनंदाअश्रू आले. खरं तर हे वादळ येण्याआधीच गुजरातमधील एका महिलेने चिमुकलीला जन्म दिला. त्यामुळे महिलेने आपल्या एका महिन्याच्या मुलीचे नाव 'बिपरजॉय' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, बिपरजॉय वादळ आज संध्याकाळपर्यंत कच्छच्या किनारपट्टीवर धडकू शकते. ज्या घरात एक महिन्यापूर्वी या चिमुकलीचा जन्म झाला ते घर देखील बिपरजॉयमुळे ग्रस्त असून चक्रीवादळाच्या भीतीने त्यांना घर सोडावे लागले आहे. सध्या मुलीचे कुटुंब कच्छ जिल्ह्यातील जखाऊ येथील एका शेल्टर होममध्ये आहे.  कच्छमधील आतापर्यंत ७० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

'वादळा'वरून नामकरण चक्रीवादळाच्या नावावरून मुलाचे अथवा मुलीचे नाव ठेवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील अनेकदा अशा बातम्या समोर आल्या आहेत. यापूर्वी तितली, फणी आणि गुलाब या चक्रीवादळांवरून चिमुकल्यांची नावे ठेवण्यात आली आहेत. आता गुजरातच्या किनारपट्टीवर धडकू पाहणाऱ्या या वादळाला नाव बांगलादेशने दिले असून ते जागतिक हवामान संघटनेशी संबंधित देशांनी स्वीकारले आहे. हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, अशा चक्री वादळांचा प्रभाव एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतो. बिपरजॉय चक्रीवादळ देखील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

'कोरोना'वरूनही ठेवली नावे विशेष बाब म्हणजे भारतात भूतकाळातील आपत्ती किंवा घटनांवरून मुलांची नावे ठेवण्यात आली आहेत. यापूर्वी कोरोना काळात उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एका कुटुंबाने आपल्या मुलीचे नाव 'कोरोना' असे ठेवले होते. याशिवाय आंध्रच्या कडप्पा जिल्ह्यातील दोन मुलांचे नावही याच विषाणूवर ठेवण्यात आली आहेत.  

टॅग्स :Gujaratगुजरातcycloneचक्रीवादळ