शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नौदलाच्या जहाजावर महिला कमांडिंग ऑफिसर, सागरी सीमा सांभाळण्याची मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 08:05 IST

Indian Navy: भारतीय नौदलाच्या जहाजावर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे, असे नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी शुक्रवारी सांगितले.

नवी दिल्ली - भारतीय नौदलाच्या जहाजावर पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे, असे नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी शुक्रवारी सांगितले. नौदलातील महिला कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या व श्रेणी देण्याच्या आपल्या धोरणानुसार निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.नौदल दिनापूर्वी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ॲडमिरल कुमार बोलत होते. या निर्णयामुळे महिला ऑफिसरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.  (वृत्तसंस्था)

राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्यास सज्जहिंद महासागरात चीनच्या वाढत्या कारवायांवर ते म्हणाले की, भारतीय नौदल या भागातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवते. आमच्या तुकड्या संपूर्ण हिंद महासागर प्रदेशात आणि त्यापलीकडे आमच्या राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्यास सज्ज आहेत. महिला अग्निवीरांच्या एकूण संख्येने एक हजाराचा आकडा पार केला आहे. ही आकडेवारी सेवेत महिलांना सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या आणि श्रेणी देण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचा पुरावा आहे’, असेही नौदल प्रमुख म्हणाले. 

त्यांना परत आणण्याचे प्रयत्न-भारत सरकार कतारमध्ये कैदेत असलेल्या आठ माजी नौसैनिकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे ॲडमिरल कुमार म्हणाले. कतारच्या न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. - भारत सरकारने फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले असून, कतारमधील उच्च न्यायालयाने ते स्वीकारले आहे. तुरुंगात असलेल्या या भारतीय नागरिकांच्या विधी पथकाने हे अपील दाखल केले आहे. - हे आठही भारतीय नागरिक अल दाहरा कंपनीत काम करत होते. त्यांना गेल्या वर्षी कथित हेरगिरीप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. कतारच्या अधिकाऱ्यांनी भारतीयांवरील आरोप उघड केलेले नाहीत. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदल