शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बायको भाडोत्री मालमत्ता किंवा वेठबिगार नाही; उच्च न्यायालयाचे मत, घटस्फोट केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 08:07 IST

पत्नीला  मोलमजुरी करणारी ‘वेठबिगार कामगार’ मानले जाऊ शकत नाही.

रायपूर : पत्नीला  मोलमजुरी करणारी ‘वेठबिगार कामगार’ मानले जाऊ शकत नाही. जिवाला धोका असताना तिला बळजबरीने सासरी राहण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे  छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

प्रिया आणि संजीत शर्मा यांचे जून २०१५ मध्ये लग्न झाले. मात्र, वैयक्तिक मतभेदांमुळे ते मे २०१६ मध्ये वेगळे झाले. पत्नीला आई-वडिलांसोबत राहायचे नाही. आई-वडिलांच्या घरी येण्यास ती आक्षेप घेते. त्यांचे घर  ‘धर्मशाळा’ नाही, असे म्हणते. नेहमी क्षुल्लक मुद्द्यांवरून त्याच्याशी भांडण करते, असा आरोप पतीने केला. 

दुसरीकडे, पत्नीने तिच्यासोबत गैरवर्तन आणि छळ करण्यात आला.  हुंडा मागितला.  पतीने गंभीर परिणामाची धमकी दिली. म्हणून, तिला त्याच्यासोबत राहण्याची इच्छा नसल्याचा दावा केला. 

संजीतने कौटुंबिक न्यायालयात क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोटासाठी अर्ज केला व तो मंजूर झाला. घटस्फोटाच्या आदेशाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. प्रियाने  सासू-सासऱ्यांचा आदर केला नाही किंवा पतीने आई-वडिलांना सोडावे, असा तिने आग्रह धरला, याचे संजीत कोणतेही पुरावे देऊ शकला नाही. उलट पतीने पत्नीशी गैरवर्तन केल्याचे व तिला धमकाविल्याचे दिसत  असल्याचे  मत व्यक्त करीत हायकोर्टाने घटस्फोट रद्द केला.

हायकोर्टाचे मत

पतीने लादलेल्या अटींमध्ये राहण्यास  पत्नी भाडोत्री मालमत्ता  किंवा वेठबिगार नाही. जिवाला धोका वाटत असेल तर  पत्नीला बळजबरीने  सासरी राहायला लावणे अपेक्षित नाही.    - न्यायाधीश गौतम भादुरी आणि संजय कुमार जैस्वाल