शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणार त्रिसदस्यीय समिती; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 05:26 IST

संसद जोपर्यंत यावर (निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्या) कायदा बनवत नाही तोपर्यंत हा नियम कायम राहील,  असे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने आपल्या निकालात म्हटले.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया आता बदलणार आहे. राष्ट्रपती एका समितीच्या शिफारशीवरून या नियुक्त्या करतील. या समितीत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा समावेश असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरुवारी हा ऐतिहासिक निकाल दिला.    

संसद जोपर्यंत यावर (निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्या) कायदा बनवत नाही तोपर्यंत हा नियम कायम राहील,  असे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने आपल्या निकालात म्हटले. मुख्य निवडणूक आयुक्त, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियमसारख्या प्रणालीची मागणी करणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने हा निकाल दिला. या घटनापीठात न्यायमूर्ती अजय रस्तोगी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय व न्यायमूर्ती सी.टी. रविकुमार यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीशी संबंधित घटनेच्या कलम ३२४ चा संदर्भ देत न्यायालयाने स्पष्ट केले की, राज्यघटनेने या नियुक्त्यांसाठी कायदा बनविण्यास सांगितले आहे. तथापि, अद्याप असा कायदा बनवला गेला नाही. जाेपर्यंत कायदा बनत नाही तोपर्यंत उपरोक्त पद्धतीने नियुक्त्या होतील.

निवडणूक प्रणालीच्या शुद्धतेवर भर   n लोकशाहीत निवडणुकांचे पावित्र्य कायम ठेवले पाहिजे, अन्यथा त्याचे विनाशकारी परिणाम होतील. निवडणूक आयोगाने घटनात्मक चौकटीत राहून काम केले पाहिजे. तो अन्यायकारक पद्धतीने वागू शकत नाही. n कायद्याचे राज्य हा लोकशाहीचा पाया असून, निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत मुक्त आणि निष्पक्षता न ठेवल्यास कायद्याचे राज्य कोलमडून पडेल, असेही न्यायालयाने म्हटले.

यापुढे अशी होणार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती

एक समिती स्थापन होईल. या समितीत पंतप्रधान असतील. याशिवाय लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा समितीत समावेश असेल. लोकसभेत विरोधी पक्षनेता नसेल, तर सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला समितीत घेण्यात येईल.

ही समिती निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी नावांची शिफारस करेल. ही शिफारस राष्ट्रपतींकडे पाठवली जाईल आणि त्यांची मान्यता मिळाल्यानंतर नियुक्ती केली जाईल.केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमुखांच्या नियुक्तीसारखीच ही प्रक्रिया असेल. सीबीआय प्रमुखांची नियुक्ती निवड समितीच्या शिफारशीवरून होते.सध्याची पद्धत n राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतात. त्यांचा कार्यकाळ सहा वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षांपर्यंत असतो.n मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींप्रमाणे वेतन मिळते. n मुख्य निवडणूक आयुक्तांना संसदेत महाभियोग आणून पदावरून हटवले जाऊ शकते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग