शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
5
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
6
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
7
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
8
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
9
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
10
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
11
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
12
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
13
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
14
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
15
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
16
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
17
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
18
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
19
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
20
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

"आई-बाबा मजूर आहेत, पास करा नाही तर लग्न लावतील", विद्यार्थिनीची भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 7:50 PM

परीक्षेच्या काळात काही नाट्यमय घडामोडी समोर येत आहेत.

राज्यात दहावीची बोर्ड परीक्षा सुरू आहे. परीक्षेच्या काळात काही नाट्यमय घडामोडी समोर येत आहेत. उघडपणे काही ठिकाणी कॉपी पुरवल्याचे निदर्शनास आले. अशातच आता बिहारमधील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. इथे विद्यार्थिनीने उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून एक भावनिक नोट लिहिली आहे. परीक्षेत विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या भन्नाट उत्तरांचे फोटो अनेकदा व्हायरल होत असतात. आता सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका विद्यार्थिनीने भन्नाट अन् भावनिक चारोळ्या लिहून शिक्षकांनाही संभ्रमात टाकले आहे. 

संबंधित विद्यार्थिनीने आग्रह करताना लिहिले की, सर प्लीज मला पास करा, नाही तर माझे पप्पा लग्न लावून देतील. खरं तर ही घटना बिहारमधील आग्रा येथील आरा मॉडल शाळेतील आहे. पेपर झाल्यानंतर आता शिक्षकांकडून त्यांची तपासणी सुरू आहे. अशातच एक भन्नाट उत्तर शिक्षकांच्या निदर्शनास आले, ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

विद्यार्थिनीची भावनिक साद! एका विद्यार्थिनीने लिहिले की, माझी आई मजूर म्हणून काम करते. आम्ही खूप गरीब आहोत. माझे वडील शेतकरी आहेत. शिक्षणाचा भार ते उचलू शकत नाहीत. म्हणूनच ते मला शिकवू इच्छित नाहीत आणि त्यांनी म्हटले आहे की, जर ३१८ गुण मिळाले नाही तर ते अभ्यास करू देणार नाहीत आणि माझे लग्न लावतील. म्हणून प्लीज माझी इज्जत वाचवा. मी गरीब कुटुंबातील मुलगी आहे. माझे वडील शेतकरी आहेत, त्यांना ४०० रुपयेही मिळत नाहीत आणि ते मला कसे शिकवणार? ही मोठी समस्या आहे आणि दुसरे काही नाही.

विद्यार्थी या प्रकारच्या नोट्स उत्तरपत्रिकेत लिहित आहेत. बिहारच्या शिक्षण मंडळाने जिल्ह्यात कॉपी तपासण्यासाठी सहा केंद्रे तयार केली आहेत. पण पेपरच्या तपासणीदरम्यान, शिक्षकांना उत्तरात कविता, शायरी, प्रार्थना आणि नोट्स सापडत आहेत. शिक्षकांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गणिताच्या पेपरात काही भावनिक उत्तरे लिहिली आहेत. 

टॅग्स :Biharबिहारexamपरीक्षा