भारताने चंद्रावर पाठवलेल्या 'चंद्रयान-3' च्या विक्रम लँडरसोबत गेलेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरून आपली खुशाली कळवली आहे. प्रज्ञान रोव्हरने एक मैसेज पाठवला आहे. यात त्याने पृथ्वीवासियांसंदर्भातही भाष्य केले आहे. रोव्हरने म्हटले आहे की, तो आणि त्याचा मित्र विक्रम लँडर संपर्कात आहेत दोघेही खुशाल आहेत. याशिवाय, लवकरच सर्वात चांगला परिणाम येणार आहे, असेही या संदेशात म्हण्यात आले आहे.
प्रज्ञान रोव्हरनं काय मैसेज दिला? -सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (आधीचे ट्विटर) LVM3-M4/CHANDRAYAAN-3 MISSION नावाच्या अकाउंटवरून प्रज्ञान रोव्हरचा मैसेज पोस्ट करण्यात आला आहे. यात ''हॅलो पृथ्वीवासियांनो! मी चंद्रयान-3 चा प्रज्ञान रोव्हर. आशा आहे की, आपण खुशाल असाल. सर्वांना कळवू इच्छितो की, मी चंद्राची रहस्ये उलगडण्याच्या आपल्या मार्गावर आहे. मी आमि माझा मित्र विक्रम लँडर संपर्कात आहोत. आमची प्रकृती चांगली आहे. सर्वात चांगला परिणाम लवकरच येत आहे...''