शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चक्क शिपायाने तपासले विद्यापीठाच्या परीक्षेचे पेपर, पाच हजार रुपयेही कमावले, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:33 IST

Madhya Pradesh News: एका महाविद्यालयाच्या परीक्षेच्या उत्तर पत्रिका चक्क शिपायाने तपासल्याचेसमोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात या शिपायाला उत्तर पत्रिका तपासण्याचं काम सोपवण्यात आलं होतं.  

एका महाविद्यालयाच्या परीक्षेच्या उत्तर पत्रिका चक्क शिपायाने तपासल्याचेसमोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात या शिपायाला उत्तर पत्रिका तपासण्याचं काम सोपवण्यात आलं होतं.  हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करत तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच यासाठी जबाबदार प्राध्यापकाला निलंबित करण्यात आलं आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मध्य प्रदेशमधील नर्मदापुरम जिल्ह्यातील पिपरिया शहीद भगत सिंग शासकीय पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये हंगामी प्राध्यापक म्हणून काम करत असलेल्या खुशबू पगारे यांच्याकडे उत्तर पत्रिका तपासणीचं काम सोपवण्यात आलं होतं. त्याचदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये महाविद्यालयातील शिपाई पन्नालाल पठारिया  उत्तर पत्रिका तपासताना दिसत आहे. जेव्हा हे प्रकरण उच्च शिक्षण विभागाकडे गेलं, तेव्हा त्वरित तपासणी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवालामधूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या अहवालामधून शिपाई पन्नालाल पठारिया याने खुशबू पगारे यांच्याकडील उत्तप पत्रिकांची तपासणी केली होती, असे समोर आले आहे. तसेच पन्नालाल याने पाच हजार रुपये घेऊन उत्तर पत्रिका तपासल्याचे मान्य केले आहे. तर खुशबू पगारे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना सांगितले की, माझी तब्येत बिघडली होती. त्यामुळे मी कॉलेजचे बुक लिफ्टर राकेश मेहर याला पाच हजार रुपये देऊन अन्य कुणाकडून तरी उत्तर पत्रिकांचं मूल्यांकन करण्यास सांगितलं होतं.

या संपूर्ण प्रकरणात उत्तरदायित्व निश्चित करताना कॉलेजचे प्रभारी प्राचार्य राकेश कुमार वर्मा आणि प्राध्यापक रामगुलाम पटेल यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उत्तर पत्रिका तपासणारा शिपाई पन्नालाल पठारिया आणि हंगामी प्राध्यापिका खुशबू पगारे यांच्याविरोधात विभागीय कारवाईचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशexamपरीक्षा