शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

Sanjay Raut: क्रांतिकारी भाषण, वेगळ्या राहुल गांधींचा साक्षात्कार देशाला झाला; संजय राऊतांची स्तुतिसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 10:15 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या भाषणाचं खासदार संजय राऊत यांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे.

नवी दिल्ली-

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या भाषणाचं खासदार संजय राऊत यांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. काल लोकसभेत वेगळ्या राहुल गांधींचा साक्षात्कार देशाला झाला, त्यांनी केलेलं भाषण क्रांतिकारी होतं, असं संजय राऊत म्हणाले. ते नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राहुल गांधी यांनी काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपली प्रतिक्रिया देताना मोदी आणि अदानींच्या नात्यावर भाष्य करत जोरदार हल्ला चढवला. मोदी आणि अदानींचं नेमकं नातं काय? हे आता देशाला कळायला हवं असं राहुल गांधी म्हणाले. तसंच राहुल यांनी मोदी आणि अदानी यांच्या एकत्र विमान प्रवासाचे काही फोटो देखील संसदेत सादर केले. याशिवाय २०१४ साली श्रीमंतांच्या यादीत ६०९ व्या स्थानी असलेले अदानी काही वर्षात थेट दुसऱ्या स्थानापर्यंत पोहोचले त्याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं, असा टोला राहुल यांनी लगावला. 

राहुल गांधींच्या भाषणाचं कौतुक करताना संजय राऊत यांनी क्रांतिकारी भाषण अशी उपमा दिली आहे. "काल संसदेत एका वेगळ्या राहुल गांधींचा साक्षात्कार देशाला झाला. त्यांनी ज्याप्रकारे संपूर्ण विषयाची मांडणी केली ते नक्कीच लक्षवेधी आहे. त्यांच्यापुढे सत्ताधारी आणि भाजपासुद्धा फार आवाज करू शकले नाहीत. राहुल गांधी यांचं कालचं भाषण क्रांतिकारीच होतं. कारण सत्य बोलणं हे क्रांतिकारी काम असतं. तशी हिंमत लागते आणि राहुल गांधी ती हिंमत दाखवत आहेत", असं संजय राऊत म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधी