शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
3
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
4
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
5
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
6
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
7
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
8
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
9
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
10
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
11
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
12
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
13
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
14
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
15
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
16
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
17
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
18
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
19
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
20
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा

कामगारांच्या सुटकेसाठी अखेरचा अडथळा पार करणारे रिअल हिरो, दिलेल्या वेळेआधी मोहीम केली फत्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 06:48 IST

Uttarkashi Tunnel Accident: सर्व मशिन्स ठप्प पडल्यानंतर अखेर बोगद्यातील राहिलेले काम हाताने  खोदकाम करून काढण्याचे ठरले तेव्हा रॅट होल कामगार मदतीला आले.

सर्व मशिन्स ठप्प पडल्यानंतर अखेर बोगद्यातील राहिलेले काम हाताने  खोदकाम करून काढण्याचे ठरले तेव्हा रॅट होल कामगार मदतीला आले. १२ जणांच्या या टीमकडे अतिशय कमी वेळ होता. त्यांनी २४ ते ३६ तासांमध्ये मलबा  हटविण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी वेळेआधीच ढिगारा उपसत अडकलेल्या कामगारांपर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार केला. या मेहनतीच्या कामासाठी त्यांनी एकही रुपया घेतला नाही. ‘आम्हांला या ऐतिहासिक मोहिमेचा भाग झाल्याबद्दल आनंद आहे,’ असे या टीममधील सर्वजण सांगत होते. 

आयुष्यातील पहिली आणि शेवटची संधी होती- वकील हसन (रॅट मायनर्सच्या टीमचे सुपरव्हायजर) देहरादूनचे अशोक सोळंकी यांचा आम्हाला फोन आला आणि त्यांनी सांगितले की आपल्याला या कामगारांना बाहेर काढायचे आहे. सोळंकी यांच्यासाठी आम्ही दोन ते अडीच किमी रॅट मायनिंगचे काम केले आहे. आमच्यासमोर आयुष्यातील पहिली आणि शेवटची संधी होती की आम्ही स्वतःला सिद्ध करू शकू. ही संधी मला सोडायची नव्हती. आमचे काम कठीण आणि जोखमीचे आहे. आर्थिक जोखमीचेही आहे. पैसे मिळतात, कधी मिळत नाहीत. कामगारांची स्थिती बदलायला हवी, अशी अपेक्षा आहे. कारण कामगारांच्या पोटाला चिमटा बसतो तेव्हा तो जीवन-मृत्यू काहीच पाहात नाही. त्याच्यासाठी काम महत्त्वाचे आहे. 

पापा आप फसें हुए लोगो को निकालकेही आना- मुन्ना कुरैशी (रॅट मायनर्स टीममधला हिरो) वकील हसन यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की आपल्याला कामगारांच्या सुटकेसासठी जायचे आहे. लगेच तयारी केली. सकाळी पाच वाजता बोगद्याच्या ठिकाणी पोहोचलो. आमचे काय होईल, अशी भीती न बाळगता एकच ध्येय होते की कामगारांना बाहेर काढायचे आहे. टीमने सांगितले आपण हे करूया. डोंगराएवढ्या संकटावर मात करायची आहे, असा आमच्या टीमने निर्धार केला. माझ्या मुलाने मला फोनवर सांगितले की, ''पापा आप फसें हुए लोगो को निकालकेही आना. मैं इंतेजार कर रहा हूं.'' त्यानंतर चोविस तासांमध्ये आम्ही मोहिम फत्ते केली. कुणाचे प्राण वाचवणे हे पुण्याचे काम आहे. असा आनंद पूर्वी कधीही झाला नाही. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडIndiaभारत