फोन करून सर्वसामान्यांना फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता बड्या सरकारी अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंगरौली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गौरव बैनल यांना मुख्य सचिवांच्या नावाने बनावट कॉल करून जिल्हा खनिज प्रतिष्ठानाच्या फंडाशी संबंधित काम करण्याचे आदेश देणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सिंगरौलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय फोनवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता, त्या फोनवरील व्यक्तीने आपण मुख्य सचिव असल्याचं सांगून डीएमएफशी संबंधित काम करण्याचे आदेश दिले होते, अशी तक्रार २५ ऑक्टोबर रोजी कलेक्ट्रेट कार्यालयातून आली होती.
दरम्यान, जिल्हाधिकारी गौरव बैनल यांना या फोनवर संशय आला. त्यांनी सापळा रचून अगदी हुशारीने आरोपींना सिंगरौली येथे बोलावून घेतले. त्यानंतर पोलिसांनी आयोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. पकडण्यात आलेल्या आरोपींची ओळख भोपाळ येथील सचिन मिश्रा, त्याचे वडील व्हीपी मिश्रा आमि सिंगरौली येथील सचिंद्र तिवारी अशी पटली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : Three arrested in Singrauli for impersonating the Chief Secretary and issuing orders to the District Collector regarding district mineral foundation funds. The Collector suspected the call and set a trap.
Web Summary : सिंगरौली में मुख्य सचिव बनकर जिला कलेक्टर को फोन कर खनिज निधि संबंधी आदेश देने के आरोप में तीन गिरफ्तार। कलेक्टर को संदेह हुआ और उन्होंने जाल बिछाया।