शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सणासुदीत चिंता पसरली; भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, जाणून घ्या लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 10:10 IST

ओमायक्रॉन बी.एफ. 7 व्हेरिएंट आधीच अस्तित्वात असलेल्या व्हेरिएंटची जागा घेईल अशी भीती आहे

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण जग बदलून टाकलं आहे. भारतात गेल्या काही महिन्यांपासून जिथे लोकांना असं वाटलं होतं की आता कोरोना महामारी पूर्णपणे संपली आहे. त्याचवेळी लोकांच्या या विश्वासाला बगल देत कोरोनाने पुन्हा दार ठोठावले आहे. भारतासह जगभरात कोरोनाचे दोन नवीन व्हेरिएंट आढळले आहेत. हे ओमायक्रॉन (Omicron) चे सब व्हेरिएंट आहेत. या नवीन व्हेरिएंटला BA.5.1.7 आणि BF.7 अशी नावे देण्यात आली आहेत. हे नवीन व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य असल्याचे मानले जाते आणि सणाच्या काळात कोरोनाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

Omicron BF.7 म्हणजे काय?Omicron चे नवीन सब-व्हेरियंट BF.7 वायव्य चीनच्या मंगोलिया स्वायत्त प्रदेशात प्रथम आढळला आणि हा सब व्हेरिएंट चीनमधील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार आहे. ओमायक्रॉनचा हा नवीन सब व्हेरिएंट अतिशय वेगाने पसरत आहे, अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियममध्येही केसेस आढळून येत आहेत. नवा ओमायक्रॉन (Omicron) BF. 7 ला 'ओमायक्रॉन स्पॉन' असेही म्हणतात. भारतातही Omicron BF. 7 चा प्रकरण समोर आले आहे. गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये मधील हे समोर आलंय. अशा परिस्थितीत सण-उत्सवाच्या काळात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

तज्ञांनी म्हटलं की, ओमायक्रॉन बी.एफ. 7 व्हेरिएंट आधीच अस्तित्वात असलेल्या व्हेरिएंटची जागा घेईल अशी भीती आहे. BF. 7 व्हेरिएंटचा संसर्ग दर खूप जास्त आहे. ओमायक्रॉन आणि त्याच्या सब व्हेरिएंटची लक्षणे अतिशय सौम्य आहेत, घाबरण्याची गरज नाही, परंतु हृदयविकार, किडनीचे आजार आणि यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये त्याची लक्षणे गंभीर असल्याचे दिसून येते. 

काय आहेत लक्षणे?सतत खोकलाऐकू येण्यास अडचणछातीत दुखणेअंग कापणेवास घेण्यास समस्या

काळजी घेण्याची गरज नवीन व्हेरिएंट आणि सब व्हेरिएंटमुळे कोविड 19 रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागतेय. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये गंभीर लक्षणे दिसून येतात. जेव्हा जेव्हा कोविडचा नवीन व्हेरिएंट येतो तेव्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वाढते. सणासुदीच्या काळात बहुतेक लोक खरेदीसाठी बाहेर पडतात जेथे सोशल डिस्टेंसिंगचा नियम अजिबात पाळला जात नाहीत. यासोबतच लोक मास्कशिवाय फिरतात त्यामुळे या काळात कोविडची प्रकरणे झपाट्याने वाढू लागतात असं तज्ञांचे म्हणणे आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन