शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 05:45 IST

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात बहुसंख्याकांची लोकसंख्येत घसरण होत अल्पसंख्याकांची संख्या वाढत असल्याचेही त्यात नमूद केले आहे.

दिल्ली : देशात १९५० ते २०१५ दरम्यान बहुसंख्याक लोकसंख्येचा कमी झालेला वाटा आणि अल्पसंख्याकांचे वाढलेले प्रमाण हे देशातील सामाजिक विविधतेला प्रोत्साहन देण्यास अनुकूल आहे. समाजातील वंचित घटकांसाठी योग्य वातावरण आणि सामाजिक पाठबळ प्रदान केल्याशिवाय त्यांच्या चांगल्या जीवनशैलीला प्रोत्साहन देणे शक्य नाही, असा निष्कर्ष पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (ईएसी-पीएम) नुकत्याच जारी केलेल्या अहवालात काढला आहे. 

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात बहुसंख्याकांची लोकसंख्येत घसरण होत अल्पसंख्याकांची संख्या वाढत असल्याचेही त्यात नमूद केले आहे. 'ईएसी-पीएम'ने जारी केलेल्या 'धार्मिक अल्पसंख्याकांचा वाटा : देशव्यापी विश्लेषण'या अहवालात देशातील एकूण लोकसंख्येतील हिंदूचा वाटा १९५० ते २०१५ या कालावधीत ७.८२ टक्क्यांनी घटला, तर मुस्लिमांचा वाटा ४३.१५ टक्क्यांनी वाढला आहे. त्यातून देशात विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे त्यात म्हटले आहे. परिषदेने याबाबत परिपूर्ण आकडेवारी मात्र दिलेली नाही. देशातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती आणि २०२१ मध्ये होणारी जनगणना झालेली नाही.

मुस्लिमबहुल देशांत लोकसंख्येत वाढ जगातील बहुतांश मुस्लिमबहुल देशांमध्ये बहुसंख्य धर्मीयांच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. मालदीवमध्ये बहुसंख्य गटाचा (शफी सुन्नी) वाटा १.४७ टक्क्यांनी घसरला आहे.

भारतीय उपखंडात बांगलादेशात वाढ बांगलादेशमध्ये बहुसंख्याक धार्मिक गटाचा वाटा १८ टक्क्यांनी वाढला आहे, ही भारतीय उपखंडातील सर्वांत मोठी वाढ आहे. १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती होऊनही, पाकिस्तानातील बहुसंख्य धार्मिक पंथाचा (हनाफी मुस्लिम) वाटा ३.७५ टक्क्यांनी वाढला. एकूण मुस्लिम लोकसंख्येचा त्यांचा वाटा १० टक्क्यांनी वाढला आहे.

१६७ देशांच्या लोकसंख्येचा अभ्यास या अहवालात जगभरातील २६७ देशांचे विश्लेषण केले आहे. जगभरात बहुसंख्याकांच्या लोकसंख्येत घसरण होत आहे. भारतातही त्यांची लोकसंख्या ७.८२ टक्क्यांनी घटली आहे. दक्षिण आशियातील शेजारच्या देशांशी तुलना केल्यास त्यातील तफावत लक्षात येते. त्या देशांत बहुसंख्याकांचे प्रमाण वाढले. बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान आणि अफगाणिस्तानमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाण कमी होणे नवे नाही, कारण तेथील लोक तणावाच्या काळात भारतात येतात, असेही अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक