शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:15 IST

Bihar Crime News: बिहारमधील बेतिया येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील कालीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपट्टी येथे जमिनीवरून सुरू असलेला वाद विकोपाला गेल्यानंतर सुमारे ४० ते ५० जणांच्या जमावाने एका घरावर हल्ला केला.

बिहारमधील बेतिया येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील कालीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपट्टी येथे जमिनीवरून सुरू असलेला वाद विकोपाला गेल्यानंतर सुमारे ४० ते ५० जणांच्या जमावाने एका घरावर हल्ला केला. त्यांनी घरामध्ये झोपलेली लहान मुले, महिला, वृद्ध व्यक्ती कुणाचीही पर्वा केली नाही. या हल्ल्यामुळे हे संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे.

पीडित कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार अचानक मोठ्या संख्येने लोक लाठ्या-काठ्या आणि दगडविटा घेऊन घराच्या दिशेने चाल करून आले. जमावातील एका महिलेने घरात झोपलेल्या एका छोट्या मुलाला जबरदस्तीने आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यावर हल्ला अधिकच तीव्र झाला. जमावाने कुटुंबातील महिला, वृद्ध, लहान मुले सर्वांनाच कुठलीही पर्वा न करता मारहाण केली. एवढंच नाही तर घराचे दरवाजे, खिडक्या सारे तोडून टाकले. या दरम्यान, हे संपूर्ण कुटुंब घरातील एका खोलील दरवाजा कसाबसा बंद करून लपून राहिले.

या हल्ल्यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीडित कुटुंबाने हल्ला होण्यापूर्वी पोलिसांकडे फोनवरून मदत मागितली होती. मात्र पोलिसांनी मदत देण्यास चालढकल केली. त्यामुळे हल्ल्याची शक्यता असताना आणि एफआयआर दाखल झाली असताना पोलिसांनी सुरक्षेचं कुठलं पाऊल का उचललं नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर या घटनेतील पीडित कुटुंबाला आपल्या सुरक्षेची चिंता सतावत आहे.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी