शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

बंगाल सरकारनं पाठवला होता मेसेज, आंदोलक डॉक्टरांनी प्रस्ताव फेटाळला; CM ममता नुसती वाट बघत बसल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 22:07 IST

... अन् मुख्यमंत्री बंगाल सचिवालयातून निघून गेल्या!

कोलकाता आरजी कार मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्ये प्रकरणावरून डॉक्टरांचा संप अद्यापही सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्युनिअर डॉक्टरांना कामावर परतण्यासंदर्भात दिलेली मुदत सायंकाळी पाच वाजता संपली आहे. यानंतर आता येत असलेल्या माहिती नुसार, बंगाल सरकारने ईमेल पाठवून विद्यार्थ्यांसोबत चर्चेसाठी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांच्या एका शिष्टमंडळाला भेटीसाटी बोलावले आहे. मात्र, आंदोलक विद्यार्थ्यांनी ममता सरकारचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

...अन् मुख्यमंत्री बंगाल सचिवालयातून निघून गेल्या -यासंदर्भात माहिती देताना टीएमसीच्या नेत्या आणि आरोग्य आणि कुटुंब राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितले की, "बंगाल सरकारने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी ईमेलद्वारे संपर्क साधला आणि 10 डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी त्यांच्या चेंबरमध्ये थांबल्या होत्या. मात्र या मेलला डॉक्टरांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. डॉक्टरांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मुख्यमंत्री बंगाल सचिवालयातून निघून गेल्या. मुख्यमंत्र्यांनी आंदोलक डॉक्टरांना पुन्हा एकदा कामावर परतण्याची विनंती केली आहे.

आरोग्य सचिवांनी केला ई-मेल -बंगाल सरकार अथवा ममता सरकारकडून चर्चेसाठी साधण्या आलेल्या संपर्कासंदर्भात प्रतिक्रिया देताना आंदोलक डॉक्टर म्हणाले, आम्हाला आश्चर्य चकित करणारा एक मेल मिळाला आहे. आमच्या पाच मागण्या होत्या, यात डीएचएस आणि डीएमई आणि आरोग्य सचिव यांना हटवण्याची मागणी होती. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आम्हाल आरोग्य सचिवांनीच मेल पाठवला आहे. 

आरोग्य सचिवांनी ईमेल करणे अपमानास्पद -ते म्हणाले, आम्ही 10 प्रतिनिधींसह नबन्ना येते येऊ शकतो. आरोग्य सचिवांकडून ईमेल आला आहे. याकडे आम्ही सकारात्मक संकेत म्हणून पाहू शकत नाही. आम्ही चर्चेसाठी सदैव तयार आहोत, मात्र आरोग्य सचिवांकडून मेल येणे, आमच्यासाठी अत्यंत अपमानास्पद आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालdoctorडॉक्टर