शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:09 IST

Jagannath Rath Yatra Elephant Chaos: रथयात्रा जमालपूर येथील मंदिरापासून निघाली असून संध्याकाळपर्यंत पुन्हा मंदिरामध्ये परतणार आहे. अहमदाबादमध्ये सकाळी ७ वाजता जगन्नाथ यात्रा सुरू झाली आहे.

अहमदाबादच्या भगवान जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना होता होता टळली आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास १८ हत्तींच्या गटाचे नेतृत्व करणारा हत्तीच बिथरल्याने मोठी धावपळ उडाली होती. ऐन गर्दीत हत्ती बिथरल्याने तो सैरावैरा धावू लागला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेले लोकही पळू लागले. वन विभागाने वेळीच या हत्तीला नियंत्रित केले आणि रथयात्रेपासून बाजुला नेले आहे. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. 

ही रथयात्रा जमालपूर येथील मंदिरापासून निघाली असून संध्याकाळपर्यंत पुन्हा मंदिरामध्ये परतणार आहे. अहमदाबादमध्ये सकाळी ७ वाजता जगन्नाथ यात्रा सुरू झाली आहे. पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान भगवानांच्या तिन्ही मूर्ती रथावर विराजमान झाल्या. रथाच्या पुढील बाजुला सोन्याचा झाडू ठेवण्यात आला आहे. नित्यविधीनंतर सकाळी ९:३० वाजता भगवानांना मंदिरातून बाहेर काढण्याच्या विधींना सुरुवात झाली आहे. पुजेनंतर बलभद्र, बहीण सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ रथात बसणार आहेत. 

पुरी राजघराण्यातील गजपती दिव्या सिंह देव हे सोन्याच्या झाडूने रथाचा पुढचा भाग झाडून रथयात्रेला सुरुवात करतील. हा रथ सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरात  नेला जातो. येथे जगन्नाथाच्या मावशीचे स्थान असल्याची मान्यता आहे. आजच्या रथयात्रेत १८ हत्ती, भारतीय संस्कृतीशी संबंधित १०१ रथ, ३० आखाडे, १८ भजन पथके आणि ३ बँड पथकांचा समावेश आहे. या यात्रेला मोठा भाविकांचा मोठा जनसागर उसळला आहे. 

टॅग्स :Jagannath Rath Yatraजगन्नाथ यात्राahmedabadअहमदाबादGujaratगुजरातViral Videoव्हायरल व्हिडिओ