जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कॉन्स्टेबल अमजद खान यांच्या पार्थिवावर बुधवारी मजलता येथील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद अमजद यांच्या एक वर्षाच्या चिमुकलीने आपल्या पित्याच्या पार्थिवाला पाहून "पापा...पापा..." अशी आर्त हाक मारली, तेव्हा अंत्यविधीला उपस्थित असलेल्यांचे काळीज पिळवटून निघाले.
शहीद अमजद खान यांचे पार्थिव जेव्हा त्यांच्या राहत्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांच्या एक वर्षाच्या मुलीला आणण्यात आले. शहिद पित्याचे पार्थिव पाहताच ती "पापा...पापा..." म्हणून ओरडू लागली. एवढेच नव्हे तर, तिने आपल्या पित्याला उठवण्याचाही प्रयत्न केला. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले.
उधमपूर जिल्ह्यातील सोन जंगलात पाकिस्तानी दहशतवाद्यांशी दोन हात करताना जवान अमजद अली खान शहीद झाले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्यांच्या बलिदानाला सलाम केला आहे. शहीद अमजद खान यांना श्रद्धांजली अर्पण करताना पोलिसांनी नायक कधीही मरत नाहीत, असे ट्विट केले.
पोलीस महासंचालक नलिन प्रभात आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अमजद खान यांच्या शौर्याला अभिवादन केले. "आम्ही शहीद कुटुंबाच्या दुःखात पूर्णपणे सहभागी आहोत आणि सदैव त्यांच्या पाठीशी राहू," अशा भावना प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आल्या.
Web Summary : Constable Amjad Khan martyred in Jammu & Kashmir, was cremated. His one-year-old daughter's cries of 'Papa' at the funeral moved mourners. The little girl tried to wake her father, leaving everyone present in tears. Police honored Khan's sacrifice, vowing support for his family.
Web Summary : जम्मू-कश्मीर में शहीद हुए कांस्टेबल अमजद खान का अंतिम संस्कार किया गया। एक साल की बेटी ने पिता के पार्थिव को देखकर 'पापा' कहकर पुकारा, जिससे सबकी आंखें नम हो गईं। पुलिस ने उनकी शहादत को सलाम किया और परिवार को समर्थन देने का वादा किया।